SA vs AUS : ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधील सर्वात खराब कामगिरी, दक्षिण आफ्रिकेने केलं 134 धावांनी पराभूत

| Updated on: Oct 12, 2023 | 9:52 PM

World Cup 2023, SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पुढची वाट बिकट झाली आहे. आता ऑस्ट्रेलियाला 7 पैकी किमान 6 सामने जिंकावे लागणार आहेत.

SA vs AUS : ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधील सर्वात खराब कामगिरी, दक्षिण आफ्रिकेने केलं 134 धावांनी पराभूत
SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव, स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी धडपड
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्या टप्प्याचे सामने पार पडले आहे. प्रत्येक संघ स्पर्धेतील दोन सामने खेळला आहे. त्यामुळे काही संघांना फायदा, तर काही संघांचं नुकसान झालं आहे. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत सलग दोन सामने गमावले आहेत. भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनं दारूण पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकात 7 गडी गमवून 311 धावा केल्या आणि विजयासाठी 312 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला, तसेच गचाळ क्षेत्ररक्षणाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागला.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

क्विंटन डिकॉक आणि टेम्बा बावुमा यांनी सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 108 धावांची भागीदारी केली. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांचं टेन्शन कमी झाला. तसेच डिकॉकने 106 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. त्याला रस्सी व्हॅन दर डुसेन, एडन मार्करम यांनी उत्तम साथ दिली. डुसेन 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर मार्करमने 44 चेंडूत 56 धावा केल्या. यामुळे संघाच्या धावसंख्येत मोठी भर पडली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 10 षटकात 2 गडी टिपत 34 धावा दिल्या. मिचेल स्टार्कने 9 षटकात 53 धावा देत 2 गडी, तर जोश हेझलवूडने 9 षटकात 1 गडी बाद करत 60 धावा दिल्या.

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन सोडला तर एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने 74 चेंडूत 46 धावा केल्या. त्या पाठोपाठ मिचेल स्टार्कने 27 आणि पॅट कमिन्सने 22 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कसिगो रबाडाने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर केशव महाराज आणि तबरेज शस्मी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दोन्ही संघांचे खेळाडू

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शमसी.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.