मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियावर 134 धावांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 7 गडी गमवून 311 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 312 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावा करू शकला. इतक्या मोठ्या फरकाने पराभूत केल्याने गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. काल परवापर्यंत गुणतालिकेत टॉपला असलेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं पहिलं स्थान काबीज केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा 2 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह +2.360 नेट रनरेट आहे. तर न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकत +1.958 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. भारत आणि पाकिस्तानला देखील फटका बसला आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत. मात्र नेट रनरेट कमी असल्याने भारत तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. सर्वात मोठा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. ऑस्ट्रेलियाची थेट घसरण नवव्या स्थानावर झाली आहे. इतकंच काय तर नेदलँडचा संघ वरचढ ठरला असून आठव्या स्थानावर आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
तिसऱ्या टप्प्याचे सामने शुक्रवारपासून सुरु होणार आहेत. या टप्प्यातील जय पराजय बरंच चित्र पालटून टाकतील. भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात हार जीत गुणतालिकेत उलथापालथ करणार यात शंका नाही. तर दुबळ्या संघाने एखाद्या दिग्गज संघाला पराभवाची धूळ चारली. तर मात्र गुणतालिकेचं चित्रच पालटून जाईल.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेतील स्थान टिकवून ठेवण्यासाठी 7 पैकी किमान 6 सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यात स्पर्धा आणखी रंगतदार वळणावर जाणार यात शंका नाही. ही स्पर्धा रॉबिन राउंड पद्धतीने होत असून प्रत्येक संघ 9 सामने खेळणार आहे. त्यापैकी आता दोन सामने झाले असून प्रत्येक संघाचे 7 सामने बाकी आहेत. टॉप 4 संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळणार आहे. 19 नोव्हेंबरला अंतिम फेरीचा सामना होईल.