मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. या सामन्यात साऊथ आफ्रिका संघाने एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला. दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. दुसरा सामना टीम इंडियाला जिंकावाच लागणार आहे. नाहीतर मालिका यजमान आफ्रिका संघ खिशात घालेल. येत्या नवीन वर्षात 3 जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात साऊथ आफ्रिका संघाचा स्टार बॉलर जेराल्ड कोएत्झी बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटीदरम्यान गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याने काही खास कामगिरी केली नाही. अवघी एक विकेट घेण्यात त्याला यश मिळालं. दोन्ही डावात मिळून त्याने 21 ओव्हर टाकल्या 99 धावा दिल्या. मोहम्मद सिराज याची विकेट त्याने घेतली होती.
COETZEE RULED OUT OF NEW YEAR’S TEST AGAINST INDIA 🇿🇦🇮🇳
Fast bowler Gerald Coetzee will miss the second Betway Test against India after developing pelvic inflammation during the first Test at SuperSport Park. #WozaNawe #BePartOfIt #SAvIND pic.twitter.com/MLHKRw86OK
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 30, 2023
वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जेराल्ड कोएत्झी याची कसोटी संघात निवड झाली होती. जेराल्डच्या जाण्याने त्याच्या जागी संघात आफ्रिका कोणाला संधी देतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केशव महाराज हा चांगला पर्याय उपलब्ध आहे त्यासोबतच वेगवान गोलंदाजांमध्ये मुल्डर आणि लुंगी एनगीडी यांचा समावेश आहे.
दरम्यान, दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीला सुरू होणार आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये बदल दिसण्याची शक्यता आहे. आफ्रिका टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी आपली सर्व ताकद लावताना दिसेल.
साऊथ आफ्रिका कसोटी संघ -:
दक्षिण आफ्रिका संघ: डीन एल्गर, एडन मार्करम टेम्बा बावुमा (C),, टोनी डी झोर्झी, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (WK), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, विआन मुल्डर, नांद्रे बर्गर, ट्रिस्टन स्टब्स