मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली (SA vs IND) आहे. तिन्ही फॉरमॅटमधील सामने होणार असून त्यामधील टी-20 मालिकेला 10 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. टी- 20 मालिकेमध्ये तीन सामने होणार आहेत. मालिकेला सुरूवात होण्याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला असून याबाबत क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. या स्टार खेळाडूच्या जाण्याने संघाला धक्का बसला आहे
टी-20 मालिकेमधून लुंगी एनगिडी हा वेगवान गोलंदाज बाहेर पडला आहे. एनगीच्या पायाला मोठी दुखापत झाल्याने तो पूर्णपणे फिट झालेला नाही. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या उपांत्य सामन्यातही तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. आफ्रिका संघाने लुंगी एनगीडी याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ब्यूरन याचा समावेश करण्यात आला आहे.
हेंड्रिक्सने दोन वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे. अशा परिस्थितीत एनगिडीची दुखापत आफ्रिका संघासाठी चिंतेची बाब आहे. . एनगिडीला वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो 26 डिसेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही हे स्पष्ट होईल.
टीम इंडिया आफ्रिकेमध्ये आठ सामने खेळणार आहे. यामध्ये तीन टी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची नियुक्ती करण्यात आली आहे. टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव, वन डेमध्ये के. एल. राहुल आणि कसोटीमध्ये रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा अद्ययावत T20 संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रिट्झके, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी (पहिली आणि दुसरी टी-20), डोनोव्हॉन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन (पहिली आणि दुसरी टी-20), हेनरिक केन्स्लास, हेन्रिक महाराज , डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स