मुंबई : वन डे वर्ल्ड कप नुकताच संपला असून आता सर्व संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 ची तयारी केली जात आहे. टीम मॅनेजमेंट वर्ल्ड कप संघबांधणीच्या कामाला लागलेले दिसत आहेत. आगामी टी-20 वर्ल्डकपचं यजमानपद हे अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडे असणार आहे. वर्ल्ड कप आधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टी-20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा खेळाडू परत आपल्या संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. या खेळाडूने देशाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून फाप डू प्लेसिस आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 आधी डू प्लेसिसने टी-20 क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. डू प्लेसिस आताही टी-20 क्रिकेटच्या लीगमध्ये खेळताना दिसतो. निवृत्त झाला असला तरी फाफ अजुनही दर्जेदार कामगिरी करताना दिसत आहे.
मला वाटतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. याबाबत मी गेल्या अने दिवसांपासून विचार करत आहे. मात्र टी-20 वर्ल्ड कपसाठी कोणत्या प्रकारच्या योजना आखल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबत मी माझ्या नवीन कोचसोबतही बोललो असल्याचं फाफ डू प्लेसिस याने म्हटलं आहे.
फाफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी फ्रँचायझी लीगमध्ये कडक फलंदाजी करत आहे. आयपीएलमध्ये फाफकडे आरसीबी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सीएसके संघानंतर फाफ आरसीबी संघाकडून खेळत आहे.
दरम्यान, फाफ डू प्लेसिस याने 69 कसोटीत 4163 धावा, 143 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5507 धावा आणि 50 टी-20 मध्ये 1528 धावा कल्या आहेत. फाफ डू प्लेसिसच्या नावावर 23 आंतरराष्ट्रीय शतके आहेत, तर आयपीएलमध्येही त्याने 130 सामन्यांमध्ये 4 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.