कोलकाता : वर्ल्ड कप 2023 सेमी फायनल सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना भिडले. या सामन्यामध्ये कांगारूंनी आफ्रिकेला नमवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिका 212 धावांवर ऑल आऊट झाली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंनी 3 गडी राखत विजय मिळवला. सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेवर तीन विकेटने मात केली आहे. दक्षिण आफ्रिका संघ परत एकदा सेमी फायनलमध्ये पराभूत झाला आणि चोकर्सचा डाग पुसण्यात अयशस्वी ठरला. सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर आफ्रिकेचा स्टार खेळाडू निवृत्त झाला आहे.
सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर आजचा सामना या खेळाडूसाठी शेवटचा होता. वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच या खेळाडूने आपल्या निवृत्तीबाबत घोषणा केली होती. मात्र अखेरचा सामना सेमी फायलन असेल असा त्याने कदाचित विचार केला नसावा. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून क्विंटन डि कॉक आहे. आफ्रिकेसाठी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये डि कॉकने दमदार खेळ केला होता.
🟡ANNOUNCEMENT 🟢
Quinton de Kock has announced his retirement from ODI cricket following the conclusion of the ICC @cricketworldcup in India 🏆 🏏
What’s your favourite Quinny moment throughout the years ? 🤔 pic.twitter.com/oyR6yV5YFZ
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 5, 2023
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. डिकॉक याने 10 सामन्याात 594 धावा केल्या आहेत. आफ्रिका संघाकडून सर्वाधिक करणारा खेळाडू ठरला आहे. यामध्ये त्याने 4 शतके केली होतीत.
दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कप साठी संघ जाहीर झाल्यावर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. डिकॉकने कसोटी क्रिकेटमधून याआधीत निवृत्ती जाहीर केलेली आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (डब्ल्यू), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेझलवूड