बंगळुरु | फखर झमान याने ठोकलेलं झंझावाती शतक आणि पावसाच्या कृपेमुळे पाकिस्तान क्रिकेट टीमने डीएलएस नियमानुसार न्यूझीलंडवर 21 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर न्यूझीलंडने पराभवाचा चौकार लगावला. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 402 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पावसामुळे पाकिस्तानला सुधारित आव्हान मिळालं. पावसाने दुसऱ्यांदा सामन्यात व्यत्यय आणला. मात्र पाकिस्तान तोवर डीएलएसनुसार सामन्यात 21 धावांनी आघाडीवर होती. त्यानुसार पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं. पाकिस्तानच्या या विजयामुळे न्यूझीलंडचा सेमी फायनलचा प्रवास हा आणखी खडतर झालाय. मात्र दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या या विजयामुळे एका टीमचा फायदा झालाय. टीम इंडियानंतर आणखी एका टीमने वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय.
पाकिस्तानच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमला फायदा झालाय. दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरलीय. दक्षिण आफ्रिकाने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकाच्या नावावर 12 पॉइंट्स आहेत. टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकाने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकाचं मोठं टेन्शन दूर झालंय. कारण न्यूझीलंडचा विजय झाला असता तर दक्षिण आफ्रिकासाठी टीम इंडिया विरुद्धचा सामना हा निर्णायक ठरला असता. मात्र पाकिस्तानमुळे दक्षिण आफ्रिकाचा मार्ग मोकळा झाला. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 नोव्हेंबर रोजी कोलकातातील ईडन गार्डनमध्ये सामना होणार आहे.
दरम्यान आता सेमी फायनलमधील उर्वरित 2 जागांसाठी एकूण 4 संघामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. या 4 संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगााणिस्तानचा समावेश आहे. इतर संघांना त्या तुलनेत सेमी फायनलसाठीची तुलना नाही बरोबर आहे.
दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये
Bringing the Protea Fire to the semi-finals 🔥
South Africa are through to the penultimate stage of #CWC23 👏 pic.twitter.com/dnJQlVhEqX
— ICC (@ICC) November 4, 2023
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.