मुंबई : क्रिकेट विश्वातून (Cricket News) शॉकिंग बातमी समोर आली आहे. स्टार ऑलराउंडरने तडकाफडकी क्रिकेट विश्वाला रामराम ठोकलाय. या क्रिकेटरने सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केलीय. या खेळाडूने ट्विट करत या निर्णयाची माहिती दिलीय. दक्षिण आफ्रिकेचा सिनिअर ऑलराउंडर फरहान बेहरदीनने (Farhaan Behardien) थांबत असल्याचं सांगितलंय. फरहानने ट्विटमध्ये लांबलचक अशी पोस्ट केलीय. तसेच त्याने क्रिकेट बोर्ड, सहकारी, कोचिंग स्टाफ अशा सर्वांचे आभार मानले आहेत. (south africa star allrounder farhaan behardien announced his retirment in all formats)
“मी गेल्या आठवड्यापासून भावनिक आहे. 18 वर्ष आले आणि गेले सुद्धा. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण 560 सामने. ज्यापैकी 97 सामने माझ्या देशासाठी. 17 ट्रॉफी आणि 4 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचं भाग्य मला लाभलं. मला काय पाठींबा देणाऱ्या मित्रांना मी धन्यवाद देतो.”, असं म्हणत फरहाने आभार मानले.
— Farhaan Behardien (@fudgie11) December 27, 2022
“माझ्या क्रिकेट कारकीर्दीत जितके प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफला भेटलो, सर्व सहकारी, मेन्टॉर, तसेच काही दिग्ग्जांसोबत खेळलोय, अशा सर्वांचाही मनापासून आभारी. विशेष करुन टायटन्स (स्कायब्लूजचे) आभार, ज्यांनी तेव्हा माझ्यासारख्या एका पोरांवर विश्वास दाखवून मला एक संधी उपलब्ध करुन दिली”.
“त्या क्रिकेट चाहत्यांचाहेही आभार ज्यांनी मला अनेक वर्ष सपोर्ट केला आणि ज्यांनी दु:ख दिलं. मी माझं स्वप्न जगलो. खरं सांगायचं झालं तर हे फार सोपं नव्हतंच. चांगल्या गोष्टी क्वचितच होतात. पण 18 वर्षांच्या कारकीर्दीत मी एकही दिवस काम केलं नाही, कारण हेच माझं पेशन आणि आवड होती”, असंही फरहानने सांगितलं.
फरहानने दक्षिण आफ्रिकेसाठी 38 टी 20 आणि 59 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे 518 आणि 1 हजार 74 धावा केल्या आहेत. तर टी 20मध्ये 3 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.