क्रिकेटरने सोडली टीमची सोबत, नक्की काय झालं?

| Updated on: Dec 31, 2022 | 6:44 PM

आपल्या खेळाडूला खेळता येणार नसल्याचं क्रिकेट बोर्डाने ट्विट करुन सांगितलंय.

क्रिकेटरने सोडली  टीमची सोबत, नक्की काय झालं?
sa vs ind
Follow us on

South Africa Tour Of Australia : दक्षिण आफ्रिका टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी (AUS vs SA Test Series) मालिका सुरु आहे. आफ्रिकेला पहिल्या 2 सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे आफ्रिकेने मालिकाही गमावली आहे. तर तिसरा सामन्याला 4 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र याआधी दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका लागलाय. आफ्रिकेचा बॅट्समन थेनिस डिब्रोयन ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत खेळू शकणार नाही. (south africa tour of australia sa vs aus batter theunis de bruyn will miss 3rd test match due to birth of his 1st child)

थेनिस ऑस्ट्रेलियावरुन आपल्या घरी परतणार आहे. थेनिसची पत्नी गरोदर आहे. या अशा महत्त्वाच्या वेळेस आपल्या पत्नीसह राहण्यासाठी थेनिस मायदेशी परतणार आहे. त्यामुळेच थेनिसला तिसऱ्या सामन्यात सहभागी होता येणार नाही. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“फलंदाज थेनिस दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. तो मायदेशी परतणार आहे. आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी हजर राहण्यासाठी तो परततोय. आम्ही त्याला शुभेच्छा देतोय”, असं ट्विट क्रिकेट साऊथ आफ्रिकाने केलंय.

थेनिसच्या जागी कुणाला संधी?

थेनिसला दुसऱ्या कसोटीत रसी वन डर डुसेच्या जागी संधी देण्यात आली होती. त्याने मेलबर्नमध्ये 12 आणि 28 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात एक डाव आणि 182 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता थेनिसच्या जागी तिसऱ्या कसोटीत कुणाला संधी मिळणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये नुकसान

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 सामन्यात झालेल्या पराभवामुळे दक्षिण आफिक्रेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या 2 स्थानी असणाऱ्या टीमच फायनलमध्ये खेळू शकतात. आफ्रिकेला फायनलमध्ये खेळायचं असेल तर टीम इंडियाचा पराभव झाला पाहिजे. तसेच न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावरही हे समीकरण अवलंबून असणार आहे. त्यामुळे आफ्रिकेचं मिशन फायनल हे जर तरच्या समीकरणावर अवलंबून आहे.