IPL 2024 | मुंबई इंडियन्सला झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू स्पर्धेतून ‘आऊट’, युवा क्रिकेटरला संधी

| Updated on: Mar 20, 2024 | 10:00 PM

IPL 2024 Mumbai Indians | हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 17 व्या मोसमात खेळण्यासाठी सज्ज झालेल्या मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. तर त्याच्याजागी 17 वर्षीय युवा खेळाडूला संधी दिली आहे.

IPL 2024 | मुंबई इंडियन्सला झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट, युवा क्रिकेटरला संधी
Follow us on

मुंबई | आयपीएल 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. यंदा हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 23 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध पार पडणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईचा खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर त्याच्या जागी अंडर 19 वर्ल्ड कप गाजवलेल्या युवा खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलने याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

श्रीलंकेसाठी खेळणारा गोलंदाज दिलशान मधुशंका हा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तर त्याच्याजागी दक्षिण आफ्रिकेसाठी अंडर 19 वर्ल्ड कप 2024 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 17 वर्षीय युवा गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. क्वेना मफाका याचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला आहे. क्वेना मफाका याचा दिलशान मधुशंका याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

श्रीलंकेसाठी 1 कसोटी, 23 एकदिवसीय आणि 14 टी 20 सामने खेळणारा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका याला आयपीएलचा शून्य अनुभव आहे. मुंबईने दिलशानसाठी 4 कोटी 60 लाख रुपयात आपल्यात घेतलं. मात्र आयपीएल डेब्यूआधीच दिलशान दुखापतीचा शिकार ठरलाय. क्वेना मफाका याने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना 6 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या. क्वेनाला त्याच्या याच कामगिरीचं बक्षिस आता मिळालंय. त्यामुळे क्वेनाला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

17 व्या मोसमाआधी बदली खेळाडूंची घोषणा

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, गेराल्ड कोएत्झी, क्वेना मफाका , नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, रोमारियो शेफर्ड आणि नमन धीर.