SAvsAUS : पाच फूटाच्या टेम्बा बावुमाने 8 फूट उंच उडी मारत घेतला कॅच, पाहा Video

| Updated on: Aug 31, 2023 | 8:18 PM

Temba Bavuma Catch : टेम्बा बावुमाने फिल्डिंग करत असताना एक कमाल कॅच घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टेम्बा बावुमाचा घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहे.

SAvsAUS : पाच फूटाच्या टेम्बा बावुमाने 8 फूट उंच उडी मारत घेतला कॅच, पाहा Video
Follow us on

मुंबई :  ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेमध्ये 3 सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. यातील पहिला सामना गुरुवारी पार पडला या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 111 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 227 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला दीडशे धावांचाही पल्ला पार करता आला नाही. अवघ्या 115 धावांवर त्यांचा डाव गुंडाळला, या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव जरी झाला असला तरी आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा चर्चेत राहिला आहे.

टेम्बा बावुमाने फिल्डिंग करत असताना एक कमाल कॅच घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामन्याच्या सोळाव्या शतकात टीम डेविड तुफानी फलंदाजी करत होता. त्याने अवघ्या 27 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांचा पाऊस पडत 64 धावा धावफलकावर लावल्या होत्या. टीम डेविडने टोलावलेला चेंडू उंच हवेत गेला. चेंडू मिड ऑफला बाऊंड्रीजवळ गेला त्यावेळी बावुमा तिकडून धावत आला अप्रतिम अशी ड्राइव्ह मारत तो अवघड झेल चपळाईने घेतला.

पाहा व्हिडीओ-

 

टेम्बा बावुमाचा घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना कमवला असला तरी सुद्धा त्यांच्याकडे अजून एक संधी आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्यांना विजय मिळवावाच लागणार आहे. जर तो सामना त्यांनी गमावला तर त्यांच्या हातून टी-20 मालिका जाणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून आवश्यकच आहे. 2 सप्टेंबरला दुसरा टी-20  सामना होणार आहे.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (C), जोश इंग्लिस (W), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, सीन अॅबॉट, नॅथन एलिस, तन्वीर संघा, स्पेन्सर जॉन्सन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टेम्बा बावुमा, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (C), डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स (W), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, लुंगी एनगिडी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी