कोलकाता : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या सेमी फायनल सामन्यात पावसाने एन्ट्री केली आहे. पाऊस आल्यामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे. आता सामना थांबला असला तरी कांगारुंनी सामन्यावर पकड मिळवली आहे. १४ ओव्हर झाल्या असून आफ्रिका संघाचे चार खेळाडू 44 धावांवर आऊट झाले आहेत.
वर्ल्ड कपमध्ये पावसाने सामना नाही झाला तर आयसीसीने दुसरा एक दिवस राखीव ठेवला आहे. जर राखीव दिवशीही पाऊस राहिला तर 20-20 ओव्हरचा सामना खेळवणार आहेत. 20 ओव्हरही नाही झाल्या तर पॉईंट टेबलचा आधार घेत अग्रस्थानी असलेल्या संघाचं फायनलचं तिकीट दिलं जाणार आहे. एकदंरित हे गणित पाहता जर सामना रद्द झाला तर आफ्रिकेलाच फायनल संघाच तिकीट मिळेल. कारण पॉईंट टेबलमध्ये आफ्रिका दुसऱ्या स्थानी होती.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड