SA vs BAN : दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट

| Updated on: Oct 23, 2023 | 3:16 PM

World Cup 2023, SA vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात बांगलादेशचा पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान जर तर वर अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे, या सामन्यात दोन्ही संघातील निवडक 11 खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.

SA vs BAN : दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट
SA vs BAN : दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश हे 11 उघडतील नशिबाचं दार! जाणून घ्या पॉइंट्स गणित आणि इतर बाबी
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हार जीत तर होतच राहाणार, पण प्रत्येक सामन्यात काही खेळाडू आपली छाप सोडून जातात. काही शतकी खेळी करून, तर काही विकेट्स घेऊन..यामुळे पॉइंट्स गणित प्रत्येक क्षणाला बदलत असतं. त्यामुळे सामन्यापूर्वी कोणते खेळाडू छाप सोडतील याबाबत पुसटसा अंदाज बांधला जातो. पण प्रत्येक वेळी अंदाज खरा ठरेल असं होत नाही. अनेकदा ठरवलेले अंदाज चुकातात सुद्धा..त्यामुळे त्या दिवशी जो खेळाडू खेळेल तोच नशिबाचं दार उघडेल असंच म्हणावं लागेल. दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 23वा सामना होत आहे. या सामन्यात कोणते 11 खेळाडू छाप सोडतील याकडे लक्ष लागून आहे. दक्षिण अफ्रिकेला नेदरलँडने पराभवाचं पाणी पाजल्याने बरीच गणितं बदलली आहे. त्यामुळे एका संघाला जास्त आणि दुसऱ्या संघाला कमी लेखून चालणार नाही.

गुणतालिकेत दक्षिण अफ्रिकन संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी बांगलादेशला हा सामना जिंकावाच लागणार आहे. अन्यथा वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं असंच म्हणावं लागेल. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेतील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 24 वनडे सामने झाले आहेत. त्यापैकी 18 सामन्यात दक्षिण अफ्रिका तर 6 सामन्यात बांगलादेशला यश मिळालं आहे.

पिच रिपोर्ट

वानखेडे स्टेडियम फलंदाजीसाठी चांगलं आहे. 300 च्या पार धावा होऊ शकतात. याच मैदानात मागच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 399 धावा केल्या आणि 400 धावांचं आव्हान दिलं होतं. यावरूनच या मैदानाचा अंदाज बांधता येईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. सुरुवातील नवीन चेंडूसह वेगवान गोलंदाजांना स्विंग होण्यास मदत होईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दक्षिण अफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

बांगलादेश: लिटन दास, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.

11 खेळाडू छाप सोडू शकतात

टीम 1 : मुशफिकुर रहीम, लिटन दास, हेन्रिच क्लासेन, क्विंटन डी कॉक (कर्णधार), रीझा हेनड्रिक्स, रस्सी व्हॅन दर डुसेन, एडन मार्करम, मार्को जानसेन (उपकर्णधार), मेहिदी हसन मिराज, कगिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झी.

टीम 2 : क्विंटन डीकॉक, हेन्रिच क्लासेन, मुशफिकुर रहिम,रीझा हेन्ड्रिक्स, रस्सी व्हॅन दर डुसेन, महमदुल्लाह, एडन मार्करम (उपकर्णधार), मार्को जानसेन (कर्णधार), मेहिदी हसन मिराज, कगिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झी.