IND vs SA | दुसऱ्या सामन्यातही पावसाचा खोडा! कसं असेल हवामान?

| Updated on: Dec 11, 2023 | 9:13 PM

South Africa vs India 2nd T20i Weather Report | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्याच सामन्यात पावसाने बॅटिंग केल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. जाणून घ्या हवामानाचा अंदाज.

IND vs SA | दुसऱ्या सामन्यातही पावसाचा खोडा! कसं असेल हवामान?
Follow us on

ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेची निराशाजनक अशी सुरुवात राहिली. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवण्याचा मानस टीम इंडियाचा होता. मात्र पावसानेच पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली. सामन्याच्या आधीपासून मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे टॉसही होऊ शकला नाही. परिणामी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. टॉसही न झाल्याने क्रिकेट चाहत्यांचा साहजिकपणे हिरमोड झाला. आता दुसरा सामना हा मंगळवारी 12 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. या सामन्यातही पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे.

ग्वेबेऱ्हामध्ये हवामान कसं असेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे सेंट जॉर्ज पार्क ग्वेबेऱ्हा येथे आयोजन करण्यात आलं आहे. ग्वेबेऱ्हामध्ये आज 11 डिसेंबर रोजी उन आहे. मात्र हवामानाचा अंदाज दुसऱ्या टी 20 सामन्याच्या हिशोबाने अनुकूल नाही. सामन्याच्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की पावसाचा धोका फारसा नाही. मात्र ढगाळ वातावरण राहिल. तसेच वेगाने वारे वाहतील.

दोघांसाठी दुसरा सामना महत्त्वाचा

दरम्यान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांसाठी दुसरा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मालिका जिंकायची असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता या दुसऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.