जोहान्सबर्ग |टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात यजमानांचा पराभव झाला आहे. आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला अवघ्या 117 धावांचं लक्ष्य दिलं होतं. 17 ओव्हरमध्ये या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत आफ्रिकेवर पहिल्या सामन्यात 8 विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाकडून साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके केली. या सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने टीम इंडियाने आघाडी घेतली आहे.
आफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन मैदानात उरतले होते. साईने सुरूवातीपासूनच आपला क्लास दाखवत आकर्षेक शॉट्स मारले. ऋतुराज गायकवाड परत एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. टीम इंडियाला 23 धावांवर पहिला धक्का बसला, ऋतुराज अवघ्या 5 धावा करून परतला होता. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतके करत टीमला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात श्रेयस 52 धावांवर माघारी परतला. तिलक वर्मा आला एक धाव केली त्यानंतर पदार्पणवीर साई सुदर्शन याने विनिंग शॉट मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
टीम इंडियाच्या फक्त दोन युवा बॉलर्सनी आफ्रिकेच्या संघाला सळो की पळो करून सोडलं. अर्शदीप सिंह याने सुरूवातीपासूनच आफ्रिकेला धक्के देत सुरूवातीच्या चार विकेट आपल्या नावावर केल्या होता. अर्शदीप गेल्यावर आवेश खानने त्याचा क्लास दाखवत आफ्रिकेच्या चार विकेट घेतल्या. शेवटच्या दोन विकेटसाठी वेट करावा लागला मात्र अर्शदीपने परत एकदा कमबॅक परत पाचवी विकेट घेत विक्रम रचला. तर कुलदीप यादवे याने शेवटची विकेट घेत आफ्रिकेला गुंडाळलं.
आजच्या वन डे सामन्यामध्ये साई सुदर्शन याने नाबाद 55 धावांची खेळी केली. अवघ्या 43 बॉलमध्ये 9 चौकार मारत टीम इंडियाला जिंकवूनच गडी बाहेर आला. साई सुदर्शन भविष्यातील मोठा खेळाडू बनू शकतो, असं चाहते बोलू लागले आहेत.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (w/c), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार