SA vs AFG | अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात, दक्षिण आफ्रिकेचा 5 विकेट्सने विजय

| Updated on: Nov 10, 2023 | 10:25 PM

South Africa vs Afghanistan | अफगाणिस्तानच्या वर्ल्ड कप 2023 मोहिमेचा शेवट झाला आहे. अफगाणिस्तानच्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाला आहे.

SA vs AFG | अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात, दक्षिण आफ्रिकेचा 5 विकेट्सने विजय
Follow us on

अहमदाबाद | दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान क्रिकेट टीमवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 47.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. अफगाणिस्तानने हा सामना गमावला. मात्र दक्षिण आफ्रिकेला सहजासहजी जिंकू दिलं नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी संघर्ष करायला लावला. दक्षिण आफ्रिकेचा हा वर्ल्ड कपमधील एकूण सातवा विजय ठरला. तर अफगाणिस्तानचं या पराभवासह वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं.

त्याआधी अफगाणिस्तानने टॉस जिंकून 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 244 धावा केल्या.अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह ओमरझई याने सर्वाधिक नॉट आऊट 97 रन्स केल्या. रहमत आणि नूर अहमद या जोडीने प्रत्येकी 26 धावा जोडल्या. ओपनर गुरुबाज याने 25 रन्स केल्या. इब्राहीम झद्रान याने 15, कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने 2, इक्राम अलिखिल याने 12, मोहम्मद नबी याने 2, राशिद खान 14, मुजीब उर रहमान आणि नवीन उल हक याने 2 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांनी टीमच्या विजयात योगदान दिलं. ओपनर विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक याने 41 धावा केल्या. कॅप्टन टेम्बा बावुमा याने 23 धावांची खेळी केली. रॅसी वॅन डेर डुसेन याने सर्वाधिक आणि नाबाद 76 धावा केल्या. एडने मारक्रम याने 25 रन्स केल्या. हेनरिच क्लासेन याने 10 धावा जोडल्या. डेव्हिड मिलरने 24 रन्स केल्या. तर अँडिले फेहलुकवायो याने नाबाद 39 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी आणि राशिद खान या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मुजीब उर रहमान याला 1 विकेट मिळाली.

त्याआधी अफगाणिस्तानने टॉस जिंकून 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 244 धावा केल्या.अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह ओमरझई याने सर्वाधिक नॉट आऊट 97 रन्स केल्या. रहमत आणि नूर अहमद या जोडीने प्रत्येकी 26 धावा जोडल्या. ओपनर गुरुबाज याने 25 रन्स केल्या. इब्राहीम झद्रान याने 15, कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने 2, इक्राम अलिखिल याने 12, मोहम्मद नबी याने 2, राशिद खान 14, मुजीब उर रहमान आणि नवीन उल हक याने 2 धावा केल्या. तर आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी याने 4 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एन्गिडी आणि केशव महाराज याने 2-2 विकेट्स मिळवल्या. तर फेहुलकोवायो याने 1 विकेट घेतली.

अफगाणिस्तानची चिवट झुंज

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज, इब्राहिम जद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.