NZ vs SA | दक्षिण आफ्रिकाचा न्यूझीलंडवर 190 धावांनी विजय, टीम इंडियाला फटका

| Updated on: Nov 01, 2023 | 9:33 PM

New Zealand vs South Africa | न्यूझीलंड क्रिकेट टीमचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासातील हा सर्वात मोठा दुसरा पराभव ठरला आहे. तसेच न्यूझीलंडचा हा सलग 4 विजयानंतर तिसरा पराभवही ठरलाय.

NZ vs SA | दक्षिण आफ्रिकाचा न्यूझीलंडवर 190 धावांनी विजय, टीम इंडियाला फटका
Follow us on

पुणे | दक्षिण आफ्रिका टीमने सलग चौथा विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. दक्षिण आफ्रिकाने न्यूझीलंडला विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र न्यूझीलंडने गुडघे टेकले. न्यूझीलंडचा 35.3 ओव्हरमध्ये 167 धावांवर कार्यक्रम आटोपला. ग्लेन फिलिप्स, विल यंग आणि डॅरेल मिचेल या तिघांनी न्यूझीलंडची लाज राखली. तसेच ग्लेन फिलिप्स याने एकाकी दिलेल्या झुंजीने न्यूझीलंडला 150 पार मजल मारता आली. न्यूझीलंडचा वर्ल्ड कप इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. तसेच न्यूझीलंडच्या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला.

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने 50 बॉलमध्ये सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. विल यंग याने 33 धावांचं योगदान दिलं. तर डॅरेल मिचेल याने 24 रन्स केल्या. मात्र इतरांनी घोर निराशा केली. न्यूझीलंडच्या 6 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर जेम्श निशाम याला भोपळा फोडण्यात अपयश आलं. तर मॅट हॅन्री झिरोवर नाबाद परतला. दक्षिण आफ्रिका टीमकडून केशव महाराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मार्को जान्सेन याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गेराल्ड कोएत्झी याने 2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा याच्या खात्यात 1 विकेट गेली.

त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकाकडून क्विंटन डी कॉक आणि वॅन डॅर डुसने या दोघांनी शतक तर डेव्हिड मिलर याने अर्धशतक ठोकलं. डी कॉक याने 114 आणि डुसने याने 133 धावांची शतकी खेळी केली. तर डेव्हिड मिलर याने 53 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकाने या जोरावर 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 357 धावा केल्या.

दरम्यान न्यूझीलंडच्या या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकाच्या विजयामुळे टीम इंडियाला फटका बसला आहे. आफ्रिकाने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मागे टाकत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

दक्षिण आफ्रिका टेबल टॉपर

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.