टी20 वर्ल्डकप विजयानंतर फिरकीपटू कुलदीप यादव याचा चाहत्यांसाठी खास मेसेज, म्हणाला…

| Updated on: Jul 08, 2024 | 5:30 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपून दहा दिवस उलटले असले तरी त्याची झिंग अजूनही कायम आहे. अजूनही या वर्ल्डकप जेतेपदाची चर्चा होताना दिसत आहे. असं असताना वर्ल्डकप विजेत्या संघातील कुलदीप यादवने चाहत्यांसाठी खास मेसेज केला आहे. या मेसेजमधून त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

टी20 वर्ल्डकप विजयानंतर फिरकीपटू कुलदीप यादव याचा चाहत्यांसाठी खास मेसेज, म्हणाला...
Follow us on

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाची सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. प्रत्येक सामन्यात कोणत्या कोणत्या खेळाडूचं योगदान राहिलं आहे. रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप संघात तसा फारसा काही बदल केला नाही. फक्त मोहम्मद सिराज ऐवजी संघात कुलदीप यादवला स्थान दिलं. या व्यतिरिक्त काहीच बदल केला नाही. कुलदीप यादवनेही या बदलला अनुरूप कामगिरी केली आणि विजयात मोलाचा वाटा उचलला. कुलदीप यादव सुरुवातीच्या तीन सामन्यात खेळला नाही. मात्र उर्वरित पाच सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने 10 विकेट्स काढल्या. यात 6.95 च्या इकोनॉमी रेटने 19 धावा देत 3 गडी बाद केल्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. जेतेपदानंतर टीम इंडियातील खेळाडू निवांत झाले आहे. असं असताना कुलदीप यादवने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्रीडारसिकांचे त्याने मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

“माझ्या सर्व भारतीय मित्रांसाठी, माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी जून महिना खास राहिला.”, कुलदीप यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले. चाहत्यांनी विजेत्या टीमचा रस्त्यावर उतरून कौतुक केलं. या प्रेमाने सर्वच क्रिकेटपटू भारावून गेले होते. “एकत्रितपणे, आम्ही एक स्वप्न पूर्ण केले ज्याचा आम्ही खूप दिवसांपासून पाठलाग करत होतो. मी माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, मीडिया आणि अर्थातच आमची शक्ती असलेल्या, संपूर्ण स्पर्धेत आम्हाला पाठिंबा देत राहिलेल्या चाहत्यांचे आभार मानू इच्छितो,” असं कुलदीप यादवने पुढे लिहिलं आहे.

“मला आशा आहे की आम्ही तुम्हा सर्वांना यातून आनंद मिळाला असेल. हे आनंदाचे क्षण तुमचे कुटुंब आणि मित्र आमच्यासोबत आयुष्यभर जपाल,” कुलदीप यादवने असं पुढे लिहिलं आहे. “कप घरी आला आहे मित्रांनो, आम्ही सर्वांनी ते केले.”, असं सांगत वर्ल्डकप स्वप्नपूर्तीबाबत आनंद व्यक्त केला आहे. भारताने 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकला आहे. तसेच टी20 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न 17 वर्षांनी पूर्ण केलं आहे. यापूर्वी 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात संघाने जेतेपद मिळवलं होतं. भारताने अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आणि जेतेपद मिळवलं.