रांची | रोहित शर्मा आणि बेन स्टोक्स या कर्णधारांच्या नेतृत्वात रांचीत टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्यास बाजूला वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वालाही सुरुवात झाली आहे. अशात शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका दिग्गजाचं निधन झाल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे वूमन्स प्रीमियर लीगपासून ते रांची कसोटीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रांचीत इंडिया-इंग्लंड सामन्यात कॅमेरामॅन्सनी काळी पट्टी बांधली आहे. कॉमेंट्री दरम्यान कॉमेंटेटर्स यांनी वाईट बातमी शेअर केल्याने क्रिकेट विश्वाला धक्का लागला आहे.
वरिष्ठ स्पोर्ट्स कॅमेरामॅन कमलानंदीमुथु थिरुवल्लूवन (Kamalanadimuthu Thiruvalluvan) उर्फ थिरू यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. थिरू हे डब्ल्यूपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स या सामन्यात सहभागी झाली होते. मात्र त्यानंतर त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या निधनानंतर शनिवारी रांची कसोटीत त्यांच्या व्यवसाय बंधूंनी हातावर काळी पट्टी बांधली
सोशल मीडियावर कमलानंदीमुथु थिरुवल्लूवन यांच्या निधनाचं वृत्त समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक आजी माजी दिग्गजांनी याबाबत दुख व्यक्त केल्या आहेत. रमीज राझा, हर्षा भोगले या आणि यासारख्या अनेक समालोचकांनी ट्विट करत कमलानंदीमुथु थिरुवल्लूवन यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बीसीसीआयनेही व्हीडिओ पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली दिली.
बीसीसीआयकडून श्रद्धांजली, सहकाऱ्यांकडून सहवेदना
The BCCI production crew wore black armbands in memory of Thiru who passed away yesterday. Our heart goes out to his near and dear ones and the BCCI offers it’s condolences to his family. pic.twitter.com/CLH0NbJP1T
— BCCI (@BCCI) February 24, 2024
दरम्यान टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत बॅकफुटवर आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसापर्यंत इंग्लंडने केलेल्या 353 च्या प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया 134 धावांनी पिछाडीवर आहे. आता तिसऱ्या दिवशी टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.