आयपीएलच्या 17 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादसाठी ट्रेव्हिस हेड याच्यासह विस्फोटक खेळी करणारा ओपनर ज्युनिअर युवराज सिंह अशी ख्याती असलेल्या अभिषेक शर्मा याने इतिहास रचला आहे. अभिषेक शर्मा याने एका क्लब सामन्यात विस्फोटक खेळी केली आहे. अभिषेकने 26 बॉलमध्ये 103 धावांची शतकी खेळी साकारली आहे. अभिषेकच्या या खेळीची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे. अभिषेकच्या या झंझावाती खेळीचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मारिओ क्रिकेट क्लब विरुद्ध पंटर्स 11 यांच्यात सामना पार पडला. मारिओ क्रिकेट क्लबने पंटर्स ईलेव्हनला विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं होतं. मारिओ क्रिकेट क्लबने 7 विकेट्स गमावून 249 धावा केल्या. या प्रत्युत्तरात अभिषेक शर्मा याने केलेल्या विस्फोटक शतकी खेळीमुळे पंटर्स ईलेव्हन्सने हे अशक्य वाटणारं आव्हान 6 विकेट्स गमावून 11 चेंडूआधी पूर्ण केलं. पंटर्सने ईलेव्हनने 18.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात 250 धावांचं विजयी आव्हान पूर्ण केलं. अभिषेक शर्मा पंटर्स ईलेव्हन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
अभिषेक शर्माची राक्षसी खेळी
Abhishek Sharma seen playing in a local club match in Gurugram right after the IPL. He scored 103 runs off 26 balls, including 14 sixes and 4 fours.
Scorecard ⬇️ pic.twitter.com/i41mGU513v
— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) June 7, 2024
अभिषेक शर्मा याने 396.15 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 26 बॉलमध्ये 14 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 103 धावा ठोकल्या. अभिषेकला खऱ्या अर्थाने हा सामना विनिंग शॉट मारुन संपवण्याची संधी होती. मात्र अभिषेकने शतकी खेळी करुन पंटर्स ईलेव्हनचा विजय निश्चित केला. अभिषेक व्यतिरिक्त पंटर्स ईलेव्हनकडून पुनीत मेहरा याने 21 बॉलमधअये 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर लक्ष टी याने 29 चेंडूत 44 धावांची नाबाद खेळी साकारली.