मुंबई : दिल्लीला हैदराबाद संघाने 144 धावांच्या आतमध्ये रोखलं होतं. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर भुवनेश्वर कुमार यानेही अप्रतिम गोलंदाजी केलेली. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि मनीश पांडे यांनी सर्वाधिक 34 धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. मयंक अग्रवालने सर्वाधिक 41 धावा त्यानंतर क्लासेनने 31 धावा आणि सुंदड याने नाबाद 24 धावा केल्या. मात्र कोणीही हैदराबादला विजय मिळवून देऊ शकलं नाही.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम (C), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (W), मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), फिलिप सॉल्ट (W), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा
सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी त्यांना 137 धावांमध्ये रोखत दिल्लीने आपला सलग दुसरा विजय मिळवला आहे.
हेन्रिक क्लासेन 19 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला होता. संघाला विजयासाठी 9 चेंडूत 19 धावांची गरज आहे. नॉर्खियाने त्याला आऊट केलं.
हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. कर्णधार मार्करम 3 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला बोल्ड केलं. हैदराबादने 14.1 षटकात 85 धावा केल्या. 35 चेंडूत 60 धावांची गरज आहे.
सनरायझर्स हैदराबादची तिसरी विकेट पडली आहे. इशांत शर्माने राहुल त्रिपाठीला आऊट केलं. 21 चेंडूत 15 धावा करून तो आऊट झाला. हैदराबादने 12.3 षटकात 75 धावा केल्या असून संघाला विजयासाठी 45 चेंडूत 70 धावांची गरज आहे.
सनरायझर्स हैदराबादने 10 षटकांत 1 गडी गमावून 58 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवाल 32 चेंडूत 39 धावा करून खेळत आहे. राहुल त्रिपाठी 11 धावा करून नाबाद आहे. या दोघांमध्ये 27 धावांची भागीदारी आहे.
दिल्लीला हैदराबाद संघाने 144 धावांच्या आतमध्ये रोखलं आहे. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार यानेही अप्रतिम गोलंदाजी केली. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि मनीश पांडे यांनी सर्वाधिक 34 धावा केल्या.
अक्षर पटेल आणि मनीष पांडे यांनी दिल्लीचा डाव सावरला आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत 24 चेंडूत 22 धावांची भागीदारी झाली आहे.
वॉशिंग्टन सुंदर याने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत दिल्लीच्या बॅटींग लाईन अपला सुरुंग लावला आहे. डेव्हिड वॉर्नर 21 धावा, मिचेल मार्श 25 धावा आणि अमन खान 8 धावा यांना एकाच ओव्हरमध्ये त्याने आऊट केलं आहे.
सॉल्ट आऊट झाल्यावर आलेल्या मिचेल मार्श याने यान्सन याच्या एका ओव्हरमध्ये चार चौकार मारले होते. मात्र टी नटराजन याने त्याला आऊट करत दुसरा धक्का दिला आहे.
मिचेल मार्श याने विकेट गमावल्यानंतर झकास सुरूवात केली आहे. एम यान्सन याच्या ओव्हरमध्ये 4 चौकार मारले आहेत. 19 धावा मार्शने काढल्या.
दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात खराब झाली आहे.फिल सॉल्ट गोल्डन डकवर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला आऊट केलं.
सामन्याला सुरूवात झाली असून दिल्लीकडून सलामीला मैदानात डेव्हिड वॉर्नर आणि फिलिप सॉल्ट आले आहेत. तर हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार पहिली ओव्हर टाकत आहे.
दोन वर्षांमध्ये दिल्ली आणि हैदराबाद दोन्ही संघ 3 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये दिल्लीने दोनवेळा विजय मिळवला आहे. तर एक सामना टाय झाला होता. आजच्या सामन्यामध्ये हैदराबाद संघ दिल्लीला नमवत विजयाचं खातं उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
दिल्ली संघाने अनुभवी खेळाडू ईशांत शर्मा याला संघात स्थान दिलं आहे. मागील सामन्यात ईशांतने चमकदार कामगिरी केली होती.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम (C), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (W), मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), फिलिप सॉल्ट (W), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार वॉर्नर याने टॉस जिंकला आहे. प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीचा संघ या हंगामात फारसा मजबूत दिसत नाही. ऋषभ पंत नसल्याचा त्यांना मोठा फटका बसत असलेला दिसत आहे. आजच्या सामन्यात दिल्ली विजय मिळवते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुखापतग्रस्त कमलेश नागरकोटीच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने अंडर-19 विश्वचषकाचा माजी कर्णधार प्रियम गर्गचा संघात समावेश केला आहे.