हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स टीमने सनरायजर्स हैदराबाद टीमवर 14 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सचा हा या मोसमातील सलग तिसरा विजय ठरला आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. या सामन्याचं आयोजन हे राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना होता. आतापर्यंत दोन्ही संघांनी खेळलेल्या 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला होता. विशेष बाब म्हणजे दोन्ही संघांचा सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव झाला होती. तर त्यानंतर सलग तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे दोन्ही संघांना ही मॅच जिंकून विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र मुंबईने हैदराबादवर मात करत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे.
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला 14 धावांनी पराभूत करत मोसमातील सलग तिसरा विजय मिळवला आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थाननी झेप घेतली आहे.
हैदरबादने मार्को जान्सेन याच्या रुपात सातवी विकेट गमावली आहे. त्यामुळे आता मुंबईला विजयासाठी 3 विकेट्सची आवश्यकता आहे.
सनरायजर्स हैदराबादने सहावी विकेट गमावली आहे. मयंक अग्रवाल 48 धावा करुन तंबूत परतला आहे.
हैदराबादने पाचवी विकेट गमावली आहे. हेनरिच क्लासेन 16 बॉलमध्ये 36 धावांची वेगवान खेळी करुन माघारी परतला.
हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे. कॅप्टन एडन मार्करम याच्यानंतर अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. अभिषेक 1 रन करून आऊट झाला. त्याआधी कॅप्टन एडन मार्करमने 22 रन्स केल्या.
हैदरबादने दुसरीविकेट गमावली आहे. राहुल त्रिपाठी 7 धावा करुन आऊट झाला आहे. जेसन बेहरनडॉर्फ यानेच त्रिपाठीला आऊट केलं.
सनरायजर्स हैदराबादने पहिली विकेट गमावली आहे. हॅरी ब्रूक 9 धावा करुन आऊट झाला आहे.
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मयंक अग्रवाल-हॅरी ब्रूक ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे.
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदाराबादला विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. मुंबईकडून कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली. इशान किशन याने 38 रन्सचं योगदान दिलं. टिळक वर्मा याने 17 बॉलमध्ये 2 फोर आणि सिक्सच्या मदतीने 37 रन्सची वादळी खेळी केली. कॅप्टन रोहित शर्मा 28 धावा करुन मैदानाबाहेर पडल. टीम डेव्हिड याने 16 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 7 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. सूर्याचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजाना चांगली सुरुवात मिळाली. मात्र कॅमरुन ग्रीन याचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी खेळी साकारता आली नाही. हैदराबादकडून मार्को जान्सेन याने 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मुंबईने चौथी विकेट गमावली आहे. इशान आणि सुूर्यकुमार यादव आऊट झाल्यानंतर मुंबई इंडियन्स अडचणीत सापडली होती. मात्र त्यानंतर टिळक वर्मा आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर टिळक 37 धावा करुन आऊट झाला.
मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. इशान किशन पाठोपाठ सूर्यकुमार यादवही आऊट झाला आहे. इशान आणि सूर्या हे दोघेही 12 व्या ओव्हमध्ये आऊट झाले.
मुंबई इंडियन्सने दुसरी विकेट गमावली आहे. इशान किशन 38 धावा करुन आऊट झाला आहे. इशानने 31 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 38 धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सने चांगल्या सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. हैदराबादच्या टी नटराजन याने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा याला 28 धावांवर आऊट केलं.
रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीने मुंबईला आश्वासक आणि अपेक्षित सुरुवात दिली आहे. या दोघांनी 4 ओव्हरमध्ये 33 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.
सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला आहे. कॅप्टन एडन मार्करम याने मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे मुंबई हैदराबादला विजयासाठी किती धावांचं आव्हान देणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्स दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 19 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. मुंबईने 19 पैकी 10 वेळा विजय मिळवला आहे. तर हैदराबादने मुंबईवर 9 सामन्यात मात केली आहे. गेल्या 5 सामन्यांपैकी मुंबईने 3 वेळा विजय मिळवला. तर हैदराबादने 2 सामन्यात बाजी मारली.
आयपीएल 16 व्या मोसमात आज 18 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.