Shikhar Dhawan | ‘गब्बर’ शिखर धवन याचा कारनामा, ऋतुराज गायकवाड याला धक्का

| Updated on: Apr 09, 2023 | 10:47 PM

पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याचं सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात अवघ्या 1 धावेने शतक राहिलं. मात्र धवनने चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाड याला मोठा झटका दिला आहे.

Shikhar Dhawan | गब्बर शिखर धवन याचा कारनामा, ऋतुराज गायकवाड याला धक्का
Follow us on

हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 14 वा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याचं अवघ्या 1 धावेने शतक राहिलं. शिखर धवन याने पंजाबच्या डावातील शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकला. त्यामुळे शिखर 99 धावांवर नाबाद राहिला. दुर्देवाने शिखर आपलं शतक पूर्ण करु शकला नाही. मात्र शिखर धवन याने मोठा कारनामा केला आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याला जोर का झटका दिला आहे.

शिखर धवन याने चेन्नई सुपर किंग्सचा युवा स्टार ओपनर ऋतुराज गायकवाड याला मागे टाकत ऑरेन्ज कॅप मिळवली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप देण्यात येते. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याआधी धवन याला ऋतुराजला मागे टाकून ऑरेन्ज कॅप मिळवण्यासाठी 63 धावांची गरज होती. या सामन्याआधी शिखर धवन याच्या नावावर 126 आणि ऋतुराजच्या नावे 189 धावा होत्या. धवनने हैदराबाद विरुद्ध 63 वी धाव पूर्ण करताच ऑरेन्ज कॅप मिळवली.

ऑरेन्ज कॅपसाठी चुरशीची लढत

शिखर धवन – 3 सामने 225 धावा (ऑेरेन्ज कॅप)

ऋतुराज गायकवाड – 3 सामने 189 धावा

डेव्हिड वॉर्नर – 3 सामने 158 धावा

जॉस बटलर – 3 सामने 152 धावा

कायले मेयर्स – 3 सामने 139 धावा

शिखर धवनची खेळी

दरम्यान शिखर धवन याने हैदराबाद विरुद्ध 66 बॉलमध्ये 12 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 99 धावांची खेळी केली. धवन यासह आयपीएलच्या इतिहासात 99 धावांवर नाबाद राहणारा एकूण चौथा फलंदाज ठरला आहे.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम कुरन, नॅथन एलिस, मोहित राठी, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.