मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चमकदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. बंगळुरूने 19.2 षटकांतच हे लक्ष्य गाठलं. विराट कोहलीने संघासाठी शतक झळकवत अवघ्या 63 चेंडूत 100 धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने शतक ठोकलंं होतं. मात्र कोहली आणि फाफ यांनी त्याच्या शतकावर पाणी फेरलं आहे. आरसीबी अजूनही प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम आहे.
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज
निर्णायक सामन्यात बंगळुरूने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. हैदराबादने बंगळुरूसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते, जे बंगळुरूने 19.2 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. बंगळुरूकडून विराट कोहलीने 100 आणि कॅप्टन डुप्लेसीने 71 धावा केल्या. या विजयासह बेंगळुरूने प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम राखले आहे.
विराट कोहलीने झंझावाती खेळी करताना शतक झळकावले. त्याने अवघ्या 62 चेंडूत शतक झळकावले. कोहलीने 12 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत. आरसीबीने 172 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी 15 धावांची गरज आहे.
फाफने आपलं अर्धशतक पूर्ण केलं असून अवघ्या 34 चेंडूत त्याने आपलं अर्धशतक केलंय. यंदाच्या आयपीएलमधील डु प्लेसिसचं आठवं अर्धशतक आहे. त्यासोबतच विराटनेही 35 चेंडूत आपलं अर्धशतक केलं असून त्याची यंदाच्या पर्वातील पाचवी हाल्फ सेंच्युरी आहे.
आरसीबीने 10 षटकांत बिनबाद 95 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी 60 चेंडूत 92 धावांची गरज आहे. विराट कोहलीने 47 धावा केल्या आहेत. डू प्लेसिस 46 धावा करून खेळत आहे.
सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान हेनरिक क्लासेनने स्फोटक खेळी केली. हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. बेंगळुरूकडून ब्रेसवेलने सर्वाधिक 2 तर सिराज, शाहबाज आणि हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हैदराबादने 15 षटकांत 3 गडी गमावून 133 धावा केल्या. हेनरिक क्लासेन 37 चेंडूत 73 धावा करून खेळत आहे. हॅरी ब्रूकने 14 धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांपुढे क्लासेनला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
क्लासेनने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. तो 28 चेंडूत 55 धावा केल्या आहेत. क्लासेन 6 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
मार्क्रम आणि क्लासेन यांनी हैदराबादसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांनी 33 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली आहे. संघाची धावसंख्या 10 षटकांत 81 धावा झाली आहे. 20 चेंडूत 40 धावा केल्यानंतर क्लासेन खेळत आहे. मार्करामने 14 धावा केल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या 50 धावांच्या पुढे गेली. संघाने 7 षटकांत 2 गडी गमावून 56 धावा केल्या. आदिन मार्कराम 4 धावा करून खेळत आहे. हेनरिक क्लासेनने 12 चेंडूत 25 धावा केल्या आहेत.
सनराईजर्स हैदराबाद संघाला एकाच ओव्हरमध्ये ब्रेसवेलने दोन धक्के दिले आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा 11 आणि राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद झाले आहेत.
सनराइजर्स हैदराबाद संघाच्या सलामीच्या जोडीमध्ये बदल पाहायला मिळाला आहे. राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा उतरले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज
आरसीबी संघाचा फाफ डू प्लेसिस याने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.