SRH vs RR : ट्रॅव्हिस हेडची विस्फोटक सुरुवात, राजस्थानविरुद्ध वादळी अर्धशतक

| Updated on: Mar 23, 2025 | 4:40 PM

Travis Head Fifty : सनरायजर्स हैदराबादचा राक्षसी फलंदाज ट्रेव्हिस हेड याने राजस्थानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कडक सुरुवात केलीय. हेडने राजस्थानच्या गोलंदाजाची धुलाई करत झंझावाती अर्धशतक झळकावलं.

SRH vs RR : ट्रॅव्हिस हेडची विस्फोटक सुरुवात, राजस्थानविरुद्ध वादळी अर्धशतक
travis head fifity srh vs rr ipl 2025
Image Credit source: IPL X Account
Follow us on

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर फंलदाज ट्रेव्हिस हेड याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात ट्रेड मार्क पद्धतीने सुरुवात केली आहे. सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या हेडने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात राजीव गांधी स्टेडियममध्ये वादळी अर्धशतकी खेळी केली आहे. राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यानंतर हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी हैदराबादला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र 45 धावांवर हैदराबादने पहिली विकेट गमावली. अभिषेक 24 धावांवर आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या ईशान किशन याच्यासोबत हेडने फटकेबाजी करत या हंगमातील पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं.

हेडने आठव्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत हे अर्धशतक पूर्ण केलं. हेडच्या आयपीएल कारकीर्दीतील हे सहावं तर 18 व्या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. तसेच हेड या 18 व्या हंगामात हैदराबादसाठी अर्धशतक करणारा पहिला आणि एकूण चौथा फलंदाज ठरला. या हंगामात कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने पहिलं अर्धशतक करणारा फलंदाज हा बहुमान मिळवला. त्यानंतर फिल सॉल्ट आणि विराट कोहली याने 50 धावांचा टप्पा ओलांडला.

हेडचं अर्धशतक

हेडने 21 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह फिफ्टी पूर्ण केली.हेडने 238.10 च्या स्ट्राईक रेटने 50 धावा केल्या. हेडने अर्धशतकानंतर फटकेबाजी अशीच सुरु ठेवली. मात्र हेडला वेळीच रोखण्यात राजस्थानला यश आलं. तुषार देशपांडे याने या राक्षसी बॅटिंग करणाऱ्या हेडला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तुषारने हेडला शिमरॉन हेटमायर याच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 31 बॉलमध्ये 216.13 च्या स्ट्राईक रेटने 67 रन्स केल्या. हेडने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार लगावले.

दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी

दरम्यान हेड आणि ईशान किशन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावा जोडल्या. हैदराबादला चौथ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 45 धावांवर पहिला झटका लागला. त्यानंतर हेड आणि किशान या दोघांनी 26 बॉलमध्ये 85 धावांची भागीदारी केली.

हेडची अर्धशतकी खेळी

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा आणि फजलहक फारुकी.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, हर्षल पटेल आणि मोहम्मद शमी.