आयपीएलच्या 17 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सनरायजर्स हैदराबादने राजस्थानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 139 धावांपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने हा सामना 36 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाज यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
राजस्थानने सातवी विकेट गमावली आहे. रोवमॅन पॉवेल 6 धावा करुन आऊट झाला आहे. हैदराबाद या विकेट्ससह विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.
राजस्थानने सहावी विकेट गमावली आहे. शिमरॉन हेटमायर आऊट झाला आहे. या विकेटसह आता हैदराबादला विजय दिसू लागला आहे.
शाहबाज अहमद याने राजस्थान रॉयल्सला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. राजस्थानचा यासह अर्धा संघ तंबूत परतला. रियान परागनंतर आर अश्विन आऊट होऊन तंबूत परतला आहे.
राजस्थान रॉयल्सने चौथी विकेट गमावली आहे. रियान पराग 10 बॉलमध्ये 6 धावा करुन आऊट झाला आहे. त्यामुळे आता राजस्थान बॅकफुटवर गेली आहे. हैदराबादने सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे.
सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला तिसरा आणि मोठा झटका दिला आहे. अभिषेक शर्मा याने कॅप्टन संजू सॅमसन याला एडम मारक्रम याच्या हाती 10 धावांवर कॅच आऊट केलं.
राजस्थान रॉयल्सने दुसरी विकेट गमावली आहे. यशस्वी जयस्वालने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल शाहबाज अहमद याच्या बॉलिंगवर कॅच आऊट झाला. अब्दुल समद याने यशस्वीचा कॅच घेतला.
सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने पहिली विकेट गमावली आहे. टॉम कोहलर-कैडमोर 10 धावा करुन आऊट झाला आहे. राजस्थानची धावसंख्या 4 ओव्हरनंतर 1 बाद 24 अशी झाली आहे.
सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर 176 धावांचं आव्हान दिलं आहे. सनरायजर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेन याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तर राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या.
आवेश खान याने हैदराबादला 14 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूवर नितीश रेड्डी आणि अब्दुल समद यादोघांना आऊट केलं. त्यामुळे आता हैदराबादचा स्कोअर 6 बाद 120 असा झालाय.
हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे. विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड 28 बॉलमध्ये 34 धावा करुन माघारी परतला. हैदराबादची 10 ओव्हरनंतर 4 बाद 99 अशी स्थिती झाली आहे.
ट्रेंट बोल्टने हैदराबादला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. ट्रेंट बोल्टने विस्फोटक फलंदाजी करत असललेल्या राहुल त्रिपाठी याला युझवेंद्र चहल याच्या हाती कॅच आऊट केलं. त्रिपाठीने 15 बॉलमध्ये 37 धावा केल्या. त्यानंतर एडन मारक्रम याला 1 धावेवर असताना युझवेंद्र चहल याच्या हाती कॅच आऊट केलं.
ट्रेंट बोल्ट याने सनरायजर्स हैदराबादला पहिला झटका दिला आहे. बोल्टने अभिषेक शर्मा याला 12 धावांवर असताना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्टची ही या हंगामातील पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्याची सातवी वेळ ठरली.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामन्याला सुरुवात झाली आहे. राजस्थानने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड ही हैदराबादची सलामी जोडी मैदानात आली आहे.
राजस्थान इम्पॅक्ट प्लेअर: शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्गर, शुभम दुबे, डोनोवन फरेरा आणि कुलदीप सेन.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.
हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर : उमरान मलिक, सनवीर सिंह, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि शाहबाज अहमद
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.
राजस्थान रॉयल्सने हैदराबाद विरुद्ध क्वालिफायर 2 या निर्णायक सामन्यात टॉस जिंकला. कॅप्टन संजू सॅमसनने फिल़्डिंगचा निर्णय घेत हैदराबादल बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील प्लेऑफ 2 सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी एमए चिदंबरम स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. विजेता संघ अंतिम फेरीतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 2 हात करेल. तर पराभूत संघाचं आव्हान इथेच संपेल. त्यामुळे दोन्ही संघात फायनलमध्ये पोहचण्यासाठी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.