Angelo Mathews ठरला दुर्देवी, क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच घडलं, पाहा व्हीडिओ

| Updated on: Nov 06, 2023 | 5:08 PM

Angelo Mathews Has Been Timed Out | श्रीलंका क्रिकेट टीमचा अँजलो मॅथ्युज हा क्रिकेट विश्वातील दुर्देवी फलंदाज ठरला आहे. बांगलादेश क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी खेळ भावनेला नख लावल्याचं म्हटलं जात आहे.

Angelo Mathews ठरला दुर्देवी, क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच घडलं, पाहा व्हीडिओ
Follow us on

नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 38 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका दोन्ही संघ आमनेसामने आहे. या सामन्यात असं काही घडलं जे आतापर्यंत कदाचित क्रिकेट इतिहासात घडलं असेल. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार एंजलो मॅथ्युज याला टाईम आऊटमुळे एकही बॉल न खेळता मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. अनेक क्रिकेट प्रेमींनी नक्की काय झालं, मॅथ्युजची नक्की काय चूक झाली, त्याला कोणत्या नियमानुसार आऊट देण्यात आलं हे आपण जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

श्रीलंकेच्या डावातील 25 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन ही ओव्हर टाकत होता. शाकीबने दुसऱ्या बॉलवर समरविक्रमा याला कॅच आऊट केलं. समरविक्रमानंतर अँजलो मॅथ्यूज मैदानात आला. इथेच सर्व गडबड झाली. मॅथ्यूज स्ट्राईक एंडवर आला. मॅथ्यूज क्रीझच्या पाया पडला. मॅथ्यूज हेल्मेटची स्ट्रीप टाईट करत होता. इतक्यात हेल्मेटची स्ट्रीप तुटली. त्यानंतर मॅथ्यूजने डगआऊटच्या दिशेने तुटलेला हेल्मेट दाखवून दुसरा हेल्मेट आणवा, असा इशारा केला. मात्र या दरम्यानच सर्व गडबड झाली. कॅप्टन शाकिबने या दरम्यान फिल्ड अंपायरकडे टाईम आऊटसाठी अपील केली.

शाकिबने केलेल्या अपिलमुळे अंपायरला मस्करी करतोय की काय असं वाटलं. तु खरंच अपील करतोय का, असं अंपायरने शाकिबला विचारलं. मी खरचं अपील करतोय, असं शाकिबने अंपायरला म्हटलं. त्यानंतर फिल्ड आणि लेग या दोन्ही अंपायर्सनी आपसात चर्चा करुन मॅथ्यूजला टाऊम आऊट घोषित केलं. अशा प्रकारे श्रीलंकेला एकाच बॉलवर 2 विकेट्स गमवावे लागले. पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे मॅथ्यूज भंयकर चिडला. त्याने या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. तसेच मॅथ्यूजने मैदानाबाहेर पडल्यानंतर कॅप्टन कुसल मेंडीस आणि इतर सहकाऱ्यांसह याबाबत चर्चा केली.

पाहा व्हीडिओ

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.