कोलंबो : श्रीलंकेच्या भारत दौऱ्याची (Sri Lanka Tour Of India 2023) सुरुवात 3 जानेवारी 2023 पासून होत आहे. आधी टी 20 सीरिज त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने (Bcci) मंगळवारी 27 डिसेंबरला भारतीय संघ जाहीर केला. यानंतर आता श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही (Sri Lanka Cricket Board) ट्विटद्वारे संघ जाहीर केल्याची माहिती दिली आहे. (sri lanka announced squad for t 20 and odi series of india tour 2023 dasun shanaka lead to team)
भानुका राजपक्षे आणि नुवान तुषारा फक्त टी 20 सीरिजमध्ये खेळताना दिसतील. तर जेफरी वांडरसे आणि नुवानिडू फर्नांडो या दोघांचा वनडे सीरिजमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच दोन्ही मालिकांसाठी 2 स्वतंत्र उपकर्णधारांची नेमणूक कपण्यात आली आहे. कुसल मेंडिस हा वनडे तर वानिंदु हसरंगा टी 20 संघाचा उपकर्णधार असणार आहे.
दसुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, कुशल मेंडिस (उपकर्णधार एकदिवसीय मालिका), भानुका राजपक्षे (फक्त टी 20 मालिकेसाठी), चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, वानिंदु हसारंगा (उपकर्णधार, टी 20 मालिका), आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे (फक्त एकदिवसीय मालिका), चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो (फक्त एकदिवसीय मालिका), दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन, लाहिरु कुमारा आणि नुवान तुशारा (फक्त टी 20 सीरिजसाठी).
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.