SL vs SA Test : 13 रन्स देत 7 विकेट्स, Marco Jansenचा दणका, श्रीलंकेचं 42 वर दहन

| Updated on: Nov 28, 2024 | 5:58 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीतील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेची पिसं काढली. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यावर दक्षिण अफ्रिकेने पकड मिळवली आहे.

SL vs SA Test : 13 रन्स देत 7 विकेट्स, Marco Jansenचा दणका,  श्रीलंकेचं 42 वर दहन
Follow us on

श्रीलंकन संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या किंग्समीड मैदानात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागा आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 191 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात श्रीलंकन संघ मजबूत स्थितीत येईल असं वाटत होतं. पण चित्र काही भलतंच घडलं. श्रीलंकेचा संघ अवघ्या 83 चेंडूतच गारद झाला. एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे 42 धावांवर सर्व काही आटोपलं. श्रीलंकेकडून कामिंदु मेंडिस आणि लहिरू कुमारा यांनीच दुहेरी आकडा गाठला. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. चार फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. तर पाच फलंदाज एकेरी धावांवर तंबूत परतले. मार्को यानसेनने भेदक गोलंदाज केली. 6.5 षटाकत फक्त 13 धावा देत 7 गडी बाद केले. गेराल्ड कोएत्झीने 3 षटकात 18 धावा देत 2, तर कगिसो रबाडाने 4 षटकात 10 धावा देत 1 गडी बाद केला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला 151 धावांची मजबूत आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवशीच ही आघाडी मिळाल्याने हा सामना पूर्णत: दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला आहे.

कसोटीत सर्वात कमी चेंडूवर सर्वबाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी दक्षिण अफ्रिकन संघ 1924 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फक्त 75 चेंडूंचा सामना करू शकला होता. 30 धावा करून संपूर्ण संघ तंबूत परतला होता. आता दक्षिण अफ्रिकन संघाने श्रीलंकेला 83 चेंडूत रोखलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सर्वात कमी धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रम आता श्रीलंकेच्या नावावर झाला आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा संघ 45 धावांवर बाद झाला होता. तर श्रीलंकेचा कसोटी इतिहासातील हा सर्वात कमी स्कोअर आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध 71 धावांवर बाद झाला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), वायन मुल्डर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा