मुंबई : आताच्या मॉर्डन क्रिकेटमध्ये अनेकवेळा विराट कोहली सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. मात्र अनेकवेळा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची कोहलीसोबत तुलना केली जाते. यावर कोहली एक मोठा खेळाडू असल्याचं बाबर आझमने म्हटलं आहे. मात्र श्रीलंकेचा माजी गोलंदाज चामिंडा वास याने जगातील एक नंबर फलंदाज कोण याबाबत बोलताना विराट कोहली याचं नाव न घेता बाबर आझमचं नाव घेतलं आहे.
विक्रम हे मोडण्यासाठीच रचले जात असतात. वेगवेगळ्या खेळाडूंनी रेकॉर्ड मोडले आहेत. विराट कोहलीची खास गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस तो तरूण होत चालला आहे. वय हे फक्त नंबर झाले असून कोहली आता ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे त्यावरून तरी तो भरपूर काही मिळवेल, असं चामिंडा वास म्हणाला. यावेळी बोलताना बाबर आझम ह नंबर वन फलंदाज असल्याचं वास यांनी सांगितलं.
सर्वांना माहित आहे की बाबर आझम हा नंबर वनचा फलंदाज आहे. संघासाठी तो ज्या प्रकारे योगदान देतो ते उल्लेखनीय आहे. युवा खेळाडूंसाठी त्याच्याकडू खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यासोबतच नसीम शाहसुद्धा उत्कृष्ट गोलंदाज आहे. लवकरच दोघांनाही लका प्रीमिअर लीगमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं चामिंडा वास म्हणाला. बाबर आझमला कोलंबो स्ट्रायकर्स संघाने विकत घेतलं आहे. लंका प्रीमिअर लीगमध्ये कोलंबो संघाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे.
दरम्यान, विराट कोहलीने आताच आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरूद्ध खेळला होता. या सामन्यामध्ये त्याने आपलं 76 आंतरराष्ट्रीय शतक झळकवलं आहे. वेस्ट इंडिजविरूद्धचा हा सामना पावसामुळे ड्रॉ करण्यात आला होता.