मुंबई : भारत आणि श्रीलंकमधील वर्ल्ड कप सामन्यामध्ये श्रीलंकेने टॉस जिंकला आहे. या सामन्यात भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना होत असून भारतस हा सामना जिंकत वर्ल्ड कपमधील आपलं सेमी फायनलचं तिकीट पक्क करणार आहे. इतकंच नाहीतर भारताने आज श्रीलंकेला पराभूत केलं तर हा भारताचा सलग सातवा विजय असणार आहे. श्रीलंकेने संघात बदल करतान एका हुकमी खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये घेतलं आहे.
🚨 Toss and Team Update 🚨
Sri Lanka win the toss and elect to bowl first.
A look at #TeamIndia‘s Playing XI 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/rKxnidWn0v#CWC23 | #MenInBlue | #INDvSL pic.twitter.com/aI5l9xm4p4
— BCCI (@BCCI) November 2, 2023
आजच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र श्रीलंका संघाने एक बदल केला आहे. धनंजय डी सिल्वा याला संघातून वगळण्याचा निर्णय श्रीलंका संघाने घेतला असून त्याच्या जागी दुशान हेमंथा याची निवड करण्यात आली आहे.
रोहितनेही टॉस हरवल्यावर बोलताना मीसुद्धा पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्यण घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे टॉस हरूनही भारताला फार काही तोटा झाला नाही.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका