भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाने विजयासाठी जोर लावला होता. श्रीलंकेने 50 षटकात 9 गडी गमवून 240 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. रोहित शर्माने आक्रमक खेळी करून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर हे आव्हान गाठताना टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. असं असताना या सामन्यादरम्यान एका वादाला फोडणी मिळाली. टी20 मालिका निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर आता वनडे सामन्यात वाद पाहायला मिळाला. श्रीलंकेचे खेळाडू दुसऱ्या सामन्यात चांगले संतापलेले दिसले. या वादाचं कारण ठरला तो विराट कोहली..पण हा वाद काय विराट कोहलीशी नव्हता तर पंचांच्या निर्णयाशी होता. विराट कोहली तर फलंदाजी करत होता. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते..
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. त्याच्याकडून या सामन्यात खरं तर चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. कोहली मैदानात येताच त्याने दोन चौकार मारत आपला हेतू स्पष्ट केला होता. पण दुसऱ्या चौकारानंतर भलतंच घडलं. फिरकीपटू अकिला धनंजया षटकातील शेवटचा चेंडू टाकत होता. त्या चेंडूवर एलबीडब्ल्यूसाठी अपील झाली. तेव्हा पंचांनी त्याला बाद असल्याचं घोषित केलं. पण विराट कोहलीने रिव्ह्यू घेतला आणि वादाला सुरुवात झाली.
Sri Lankan players wasn’t happy with the DRS and arguing with umpires.
– Virat Kohli is smiling 😁#ViratKohli𓃵 #RohitSharma𓃵 #RohitSharma #INDvSL #ViratKohli #ODIs pic.twitter.com/QtciV2sDRd— Marvelous claw🌊 (@entertainerclaw) August 4, 2024
Virat Kohli looks on when Kusal Mendis throws his helmet in anger after not out decision from 3rd umpire. #ViratKohli #INDvsSL pic.twitter.com/eTKj6AZi9v
— Mufa.🧞 (@mufakohli) August 4, 2024
रिप्लेत चेंडू विराट कोहलीच्या बॅटच्या अगदी जवळ होता. तेव्हाच स्नीकोमीटरमध्ये आवाजाची नोंद झाली. त्यामुळे बॅटला लागून चेंडू पॅडला लागल्याचं त्यावरून सिद्ध होत होतं. त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे निर्णय बदलण्याशिवाय काही पर्याय नव्हता. हा निर्णय येताच श्रीलंकेचे खेळाडू भडकले. इतकंच काय तर पंचांशी वाद देखील घातला. विकेटकीपर कुसल मेंडिसने हेल्मेट काढून जमिनीवर आपटलं. कर्णधार चरिथ असलंकाही पंचांशी निर्णयावरून वाद घालू लागला. श्रीलंकेचा कोच सनथ जयसूर्या ड्रेसिंग रुममधून मैदानात आला आणि बाउंड्रीवरील चौथ्या पंचांना प्रश्न विचारू लागला. यावेळी श्रीलंकन खेळाडू कोहलीला काहीतरी विचारू लागले, पण कोहलीन फक्त हसला आणि काहीच बोलला नाही. दरम्यान, विराट कोहली काही खास करू शकला नाही. 19 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.