मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूचा अपघात झाला असून त्याच्यावर आता रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की त्याच्या गाडीचा चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर फोटो व्हायरल झाले आहेत. विरूद्ध दिशेने येणाऱ्या मिनी ट्रक आणि त्याच्या कारची समोरोसमोर धडक झाली. सकाळी सात वाजताच्या सुमारास अनुराधापुरा येथील थिरापने परिसरात हा अपघात झाला.
श्रीलंकां संघाचा माजी कर्धणार असलेल्या लाहिरू थिरिमाने याचा कार अपघात झाला. लाहिरू थिरिमाने सध्या लेजेंड्स क्रिकेट ट्रॉफी 2024 मध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने अपघातानंतर त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. लाहिरू थिरिमाने याला गंभीर अशी दुखापत झाली नाहीये.मात्र अपघाताचे फोटो पाहून मनात कालवाकालव झाल्याशिवाय होणार नाही. भीतीदायक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पाहायला मिळत आहेत.
श्रीलंका संघाचा माजी खेळाडू असलेल्या लाहिरू थिरिमाने याने 2023 वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. लाहिरू थिरिमानेकडे निवड समितीने लक्ष दिलं नाही शेवटी त्याने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
2010 साली टीम इंडियाविरूद्ध त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर एक वर्षानंतर 2011 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. श्रीलंका संघाकडून त्याने 44 कसोटी आणि एकदिवसीय आणि 26 टी-20 सामने खेळले होते. 2014 लाआशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. आपल्या नेतृत्त्वाखाली त्याने संघाला चॅम्पियन केलं होतं.
March 11, 2024: Lahiru Thirimanne scored 90 runs and dedicated the Player of the Match award to his family.
March 13, 2024: He played for the New York Strikers in the Legends Cricket Trophy in Pallekele.
March 14, 2024: He was hospitalized after an accident in Thrippane,… pic.twitter.com/BxC8VShh6o
— CricTracker (@Cricketracker) March 14, 2024
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्या अपघाताची सर्वांना आठवण झाली. पंतच्या अपघाताचेही सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते. 30 डिसेंबर 2022 रोजी पंतचा आणखी भीषण कार अपघात झाला, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. सुदैवाने पंत या अपघातातून वाचला आणि तो आता येत्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.