Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर याची पहिली विकेट अन् पोरानं 14 वर्षांनी बापाच्या विकेटचा बदला घेतलाच!

| Updated on: Apr 19, 2023 | 6:43 PM

दुसरा सामना खेळणाऱ्या अर्जुनला शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या कारकिर्दीमधील पहिली विकेट मिळाली. 14 वर्षांनंतर आपल्या वडिलांचा बदला त्याने पुर्ण केलाय. नेमकं अर्जुनने केलंय तरी काय ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर याची पहिली विकेट अन् पोरानं 14 वर्षांनी बापाच्या विकेटचा बदला घेतलाच!
Follow us on

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकर याने अंतिम ओव्हर टाकत सामना पलटवला. दुसरा सामना खेळणाऱ्या अर्जुनने शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या कारकिर्दीमधील पहिली विकेट मिळाली. या विकेटसह त्याने संघाला 14 धावांनी सामना जिंकून दिला. त्यासोबतच त्याने एक मोठा पराक्रमही केलाय. 14 वर्षांनंतर आपल्या वडिलांचा बदला त्याने पुर्ण केलाय. नेमकं अर्जुनने केलंय तरी काय ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

14 वर्षांआधी म्हणजे 2009 साली रणजी ट्रॉफीचा फायनल सामना होता. मुंबई आणि यूपी यांच्यात हा सामना सुरू होता. सचिन हा मुंबई संघाकडून खेळत होता, सचिन मैदानात उतरला होता आणि युपीकडून भुवनेश्वर कुमार बॉलिंग करत होता. पहिल्याच चेंडूवर भुवीने सचिनला कॅच आऊट केलं.

बॅटला लागून चेंडू सचिनच्या थायपॅडला लागला आणि हवेत उडाला. हा चेंडू शॉर्ट मिड-विकेटवर असलेल्या खेळाडूने हवेत सूर मारत एक जबरदस्त झेल त्याने पकडला. युवा भुवनेश्वर कुमार त्यावेळी चांगलाच चर्चेत आला, त्याच वर्षी आयपीएलमध्ये त्याने पुणे वॉरिअर्स संघाकडून पदार्पण केलं होतं.

मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये हैदराबाद संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती. मुंबईकडून अर्जुन गोलंदाजी करत होता, त्याने फक्त अवघ्या 5 धावाच दिल्या आणि फलंदाजी करत असलेल्या भुवनेश्वर कुमारला त्याच मैदानावर शून्यावर बाद करत आपल्या वडिलांच्या विकेटचा बदला घेतला.

शेवटची ओव्हर टाकताना भल्याभल्या गोलंदाजांना मार बसतो. मात्र युवा अर्जुनने मोठ्या आत्मविश्वासाने आणि चतुराईने यॉर्कर ओव्हर टाकत संघाला विजय मिळवून दिला. सचिन तेंडुलकर स्वत: हा आतमध्ये बसून आपल्या मुलाची  बॉलिंग पाहत होता. सामना जिंकल्यावर तो बाहेर आला त्यावेळी पोराच्या कामगिरीचा एका बापाच्या चेहऱ्यावर जसा आनंद असतो तो दिसत होता.

शेवटची ओव्हर टाकताना प्रत्येक गोलंदाजावर एक दबाव असतो. मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावर तो दबाव कुठेच दिसून आला नाही. अर्जुन एक एक बॉल टाकत गेला. ओव्हरमधील पाचव्या बॉलवर भुवनेश्वर कुमार याला रोहित शर्माकरवी कॅच आऊट केलं. यासह हैदराबाद ऑलआऊट झाली आणि अर्जुनला आयपीएलमधील पहिली विकेटही मिळाली.