Steve Smithच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील वाईट विक्रमाचा मानकरी!

| Updated on: Oct 17, 2023 | 5:39 PM

Steve Smith World Cup : ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ याच्या नावावर नकोसा विक्रम आपल्या नावावर झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये असा वाईट विक्रम आपल्या नावावर करूण घेणारा स्मि्थ एकमेव खेळाडू आहे.

Steve Smithच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील वाईट विक्रमाचा मानकरी!
Follow us on

मुंबई : यंदाच्या वर्ल्ड कप2023 मध्ये ऑस्ट्रिलियाचा संघाला आपला पहिला विजय मिळवण्यासाठी तीन सामन्यांची वाट पाहावी लागली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये कांगारूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेचा पराभव केला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ फेल गेला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातही शून्यावर गेला, या खराब कामगिरीसह स्मिथच्या नावाला मोठा डाग लागला आहे.

या खराब विक्रमाची स्मिथच्या नावावर नोंद!

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होणारा स्मिथ भारतीय भूमीवर चौथ्यांदा शून्यावर चौथ्यांदा बाद झाला आहे. स्टीव्ह स्मिथ भारतीय भूमीवर शून्यावर आऊट होणारा एकमेव ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. कांगारू संघाचा इतिहास पाहिला तर एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज  चार किंवा त्याच्यापेक्षा जास्तवेळा आऊट झालेला नाही.

आकडेवारी पाहिली तर स्मिथने ऑस्ट्रेलियाबाहेर 77 एकदिवसीय डावात 2506 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 35 आहे ज्यात तीन शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.  विश्वचषकातील त्याचे स्मिथचं हे पहिल्यांदाच डक ठरलं आहे.  भारताविरूद्धच्या सामन्यामध्ये स्मिथ 19 धावा काढून स्वस्तात आऊट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 46 धावा करून तो बाद झालेला, दुसऱ्या सामन्यातही कांगारूंना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.

स्टीव्ह स्मिथ याला फॉर्ममध्ये येण्याची गरज आहे, कारण संघाला सेमी फायनलमध्ये जागा मिळवायची असले स्मिथचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा आहे. भारतामध्ये स्मिथचे आकडे चांगले आहेत मात्र अद्याप त्याचा सूर गवसलेला नाही. सेमी फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी सात सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे.

दरम्यान, श्रीलंकेविरूद्धच्या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने पॉईंट टेबलमध्ये आठव्या स्थानी झेप घेतली आहे. तर एक नंबरल टीम इंडिया असून दुसऱ्या स्थानी न्यूझीलंड संघ आहे. कांगारूंना आता उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.