कसोटी फॉर्मेट संपवण्याची सुपारी! दक्षिण अफ्रिकेचा संघ पाहताच स्टीव्ह वॉचा आयसीसी बीसीसीआयवर गंभीर आरोप

| Updated on: Jan 01, 2024 | 6:13 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपमुळे कसोटी सामन्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे. प्रत्येक कसोटी सामन्याच्या निकालामुळे गुणतालिकेवर परिणाम होतो. दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभूत करताच पहिलं स्थान गाठलं आहे. दुसरीकडे, संघ निवडीवरून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने संताप व्यक्त केला आहे. आयसीसी आणि बीसीसीआयवर गंभीर आरोप केला आहे.

कसोटी फॉर्मेट संपवण्याची सुपारी! दक्षिण अफ्रिकेचा संघ पाहताच स्टीव्ह वॉचा आयसीसी बीसीसीआयवर गंभीर आरोप
दक्षिण अफ्रिकेचा संघ पाहताच स्टीव्ह वॉ संतापला, आयसीसी आणि बीसीसीआयला सुनावले खडे बोल
Follow us on

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ याने आयसीसी आणि बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. दक्षिण अफ्रिकन संघाची घोषणा होताच तळपायाची आग मस्तकात गेली आहे. कसोटी क्रिकेट संपवण्यासाठी जाणीवपूर्वक असं केलं जात असल्याची शंका व्यक्त केली आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 3 जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना होणार आहे. या दौऱ्यात दक्षिण अफ्रिका दोन कसोटी सामने खेळणार आहे. 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी असा पहिला सामना, तर 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी असा दुसरा सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंड दौऱ्यासाठी 7 अनकॅप्ड खेळाडूंची निवड केली आहे. त्यामुळे स्टीव्ह वॉने नाराजी व्यक्त केली आहे. कसोटीला प्राथमिकता देत नसल्याचं कारण सांगतत आयसीसी आणि बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत.

ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने सांगितलं की, “दक्षिण अफ्रिकने आपल्या टी20 लीगला प्राथमिकता देण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यासाठी जाणीवपूर्वक कमकुवत संघाची निवड केली. क्रिकेट बोर्ड कसोटीला प्राधान्य देत नाही. यासाठीच 7 अनकॅप्ड खेळाडूंना सधी मिळाली आहे. यात कर्णधार नील ब्रँडचाही समावेश आहे.”

“दक्षिण अफ्रिकेसोबत आयसीसी, भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डही यासाठी तितकंच जबाबदार आहे. हे सर्व क्रिकेट बोर्ड कसोटी फॉर्मेट नाश करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. खरं तर या क्रिकेट बोर्डांनी कसोटी फॉर्मेट वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे. इतिहास आणि परंपरेचंही काही महत्त्व असतं की नाही.”, असे खडे बोल स्टीव्ह याने सुनावले.

“कसोटी फॉर्मेट वाचवण्यासाठी आताच काही ठोस पावलं उचलली गेली नाही तर सर डॉन ब्रॅडमॅन, ग्रेस सोबर्ससारख्या महान खेळाडूंची प्रासंगिकता गमावतील. मी न्यूझीलंडच्या जागी असतो तर मालिका खेळण्यास नकार दिला असता.”, असा निशाणाही स्टीव्ह वॉ याने साधला.

दक्षिण आफ्रिका कसोटी संघ: नील ब्रँड (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, रुआन डी स्वार्ड, क्लाईड फॉर्च्युइन, झुबेर हमझा, त्शेपो मोरेकी, मिहलाली मपोंगवाना, डुआन ऑलिव्हियर, डेन पॅटरसन, कीगन पीटरसन, डेन पिएड, रेनार्ड व्हॅन टोंडर, शॉन वॉन बर्ग, आणि खाया झोंडो.