मुंबई : इंग्लंड संघाचा खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड याने (Stuart Broad Retirement) अचानक शनिवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या क्रिकेट निवृत्तीची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Stuart Broad Retirement) अॅशेसमधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर ब्रॉडने याबाबत माहिती दिली. भारतीय क्रिकेट चाहत्यांना ब्रॉडची काही वेगळी ओळख करून द्यायला नको. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने टी-२० वर्ल्ड कपमध्ये मारलेले सलग सहा सिक्सर सर्वांना माहितीच असतील, युवीने ज्या बॉलरला धुतलं होतं तो ब्रॉडच होता.
२००६ साली पदार्पण केलेल्या स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी कारकिर्द १७ वर्षांची राहिली. या काळात त्याने अनेक विक्रम रचले आणि संघाच्या विजयांमध्ये महत्त्वाची भूमिक बजावली. युवीने त्याला मारलेले सिक्स सर्वांना माहित असतील मात्र ब्रॉडने असे काही विक्रम केले आहेत जे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Big news from the #Ashes on Saturday with England’s veteran quick announcing his retirement at the completion of the current series ?#WTC25 | #ENGvAUShttps://t.co/Of8YHHkR13
— ICC (@ICC) July 29, 2023
अॅशेसमध्ये फास्टर बॉलरने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम ब्रॉडच्या नावावर आहे. २०१५ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने १५ धावा घेत ८ विकेट्स घेतल्या होत्या. अशी कामगिरी करणारा अॅशेसमधील तो एकमेव गोलंदाज आहे.
स्टुअर्ट ब्रॉड याने कसोटीमध्ये दोनवेळा हॅट्रीक घेणाऱ्या चार गोलंदाजांपैकी आहे. वसीम अक्रमनंतर दोन कसोटी हॅट्रीक घेणारा तो बॉवर आहे. २०११ आणि २०१४ मध्ये त्याने श्रीलंका संघाविरूद्ध हा विक्रम केला होता.
स्टुअर्ट ब्रॉड हा कसोटी क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. ब्रॉडने एका ओव्हरमध्ये ३५ धावा केल्या होत्या. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने धावा ठोकल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये ६०० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा जगातील ब्रॉड हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. १६७ सामन्यांमध्ये ६०२ विकेट्स घेतल्या आहेत.