मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) प्रवास संपला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG) धावांनी भरलेल्या सामन्यात कोलकाता संघाला दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे कोलकाता बाहेर पडला आणि लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. या मोसमात प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तो दुसरा संघ ठरला आहे. पण, हा अंतिम निकाल आहे. काल सामन्यात काहीतरी घडले होते. त्यामुळे तणाव वाढला होता. उत्साह शिगेला पोहचला होता. आणि लखनौच्या प्लोऑफची प्रतीक्षा वाढत चालली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याच्या शेवटच्या षटकात या सर्व गोष्टी पहायला मिळाल्या. एकूण 211 धावांचा पाठलाग करताना कोलकाताला शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 21 धावा शिल्लक होत्या. लखनौने या धावसंख्येच्या बचावाची कमान आपल्या 11 कोटींचा खेळाडू असलेल्या मार्कस स्टॉइनिसकडे सोपवली. त्यानंतर त्यानं असं कही केलं की त्याच्या कामगिरीची चर्चा रंगली.
मार्कस स्टॉइनिस कोलकाताचे शेवटचे षटक टाकायला आला. केकेआरचा फलंदाज रिंकू सिंग समोर स्ट्राइकवर होता. स्ट्राइनिसने विकेटवर गोलंदाजी सुरू केली. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. क्षेत्र बदलत त्याने दुसरा चेंडू मधल्या स्टंपवर टाकला आणि तो संथपणे टाकला. चेंडूचा वेग 127 किमी प्रतितास होता. त्यावर रिंकू सिंगने जबरदस्त षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर स्टॉइनिसला वाटले की तो यॉर्कर टाकेल पण तो चुकला आणि रिंकू सिंगला आणखी एक षटकार मारण्याची संधी मिळाली. स्टॉइनिसला आता 11 कोटी रुपयांमध्ये राखून ठेवण्यात आले आहे. कारण, तो लखनौच्या अपक्षेपेक्षा जास्त चांगला खेळलाय. तो शून्य म्हणजेच झिरो होताना अचानक हिरो झालाय. कारण पहिल्याच तीन चेंडूत त्याने सोळा धावा झाल्यानंतर कोलकाताला विजयासाठी शेवटच्या तीन चेंडूत पाच धावा करायच्या होत्या.
स्टॉइनिसच्या चौथ्या चेंडूवर रिंकू सिंगने दोन धावा घेतल्या. म्हणजेच आता कोलकाताला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूत 3 धावंची गरज होती. पण पाचव्या चेंडूवर जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. यामुळे कोलकात्याला हाती असलेला सामना पुन्हा लखनौकडे गेला. पाचव्या चेंडूवर रिंकूने शॉट खेळला पण यार्डच्या आत तो झेलला गेला. नुसती उडी मारली नाही तर अशा प्रकारे पकडला गेला की सगळेच आश्चर्यचकित झाले. एविन लुईसने रिंकूचा हा अप्रतिम झेल टीपला. रिंकू बाद झाल्यानंतर आता कोलकाताला शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या. उमेश यादव आला. मोठे फटके मारण्याची हातोटी होती. त्यामुळे फारशी आशा नव्हती. सुपर ओव्हरसाठीही शक्यता निर्माण होऊ लागली होती. पण स्टॉइनिसने अशी कोणतीही शक्यता सत्यात उतरू दिली नाही. शेवटच्या चेंडूवर उमेशला क्लीन बॉलिंग करून तो लखनौच्या विजयाचा हिरो ठरला.