मुंबई : आशिया कप 2023ध्ये दुसऱ्यांदा टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी द्यायची यावरून मॅनेजमेंटचा कस लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये आता राहुल, ईशान आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये कोणाला एकाला तरी बसावं लागणार आहे. राहुल फिक्स असणार मात्र श्रेयस आणि किशन यांच्यामध्ये कोणाला संधी द्यायची यावरून मोठी गोची होणार आहे. यावर माजी खेळाडू सुनी गावसकर यांनी एक सल्ला दिला आहे.
चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्यात एकाला संधी मिळेल. ईशान किशन सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे तो पाहता त्याला संघाता जागा मिळेल. राहुलला जर संधी मिळाली तर ईशान किशनला कीपर म्हणून घेतल्याने फायदा होणार आहे. राहुल आताच बरा असल्याने राहुलला गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे ईशान किशन विकेट कीपिंग करण्याचं फायद्याचं ठरेल, असं सुनील गावसकर म्हणाले.
आशिया कपमध्ये सुपर 4 मधील सामने सुरू झाले असून पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पार पडला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तातने एकतर्फी विजय मिळवला होता. या विजयासह सुपर 4 मध्ये पाकिस्तानमध्ये संघाने आपलं स्थान आणखी पक्क केलं आहे. आता शनिवारी बांगलादेश आणि श्रालंकेमध्ये दुसरा सामना होणार असून बांगलादेशसाठी करो या मरो असणार आहे.
आशिया कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा