IND vs SA | ‘वर्कलोडचं कारण देत सूट देणं म्हणजे मूर्खपणा’, सुनील गावसकरांनी केली टीम इंडियाची पोलखोल

| Updated on: Dec 29, 2023 | 6:12 PM

Sunil Gavaskar on team india : आफ्रिका संघाने पहिल्या कसोटी सामन्यात कागदी वाघांना उघडं पाडत एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. जगातील सर्वात मजूबत संघांपैकी एक असलेल्या टीम इंडियाची अवस्था वाईट झाली. या पराभवानंतर सुनील गावसकर यांनी टीम इंडियाची पोलखोल केली आहे.

IND vs SA | वर्कलोडचं कारण देत सूट देणं म्हणजे मूर्खपणा, सुनील गावसकरांनी केली टीम इंडियाची पोलखोल
Sunil Gavaskar Rohit Sharma lost Fist test against south africa
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान आफ्रिका संघाने दमदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने फक्त सामनाच गमावला नसून आयीसीसीने दोन गुण कमी केलेत. स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने ही कारवाई केलीय. सेंच्युनरियन येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियान एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या कमजोरीबाबत पोलखोल केली आहे.

सुनील गावसकर काय म्हणाले?

जेव्हा टीम इंडिया न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिकेला कसोटी दौऱ्यावर जाते त्याआधी सराव सामने खेळणं गरजेचं आहे. टीम इंडियाला कसोटी मालिका जिंकायची असेल तर युवा खेळाडूंना जास्तीत जास्त सराव सामने खेळायला पाहिजेत. सीनिअर खेळाडूंना एक किवा दोन दिवस आधी संघात सामील करता. मात्र मोठ्या मालिकेआधी आफ्रिकेच्या टीम A संघासोबत सराव सामने खेळले पाहिजे होते. याचा नक्कीच तुम्हाला कसोटी सामन्यामध्ये फायदा होऊ शकतो. जे खेळाडू सराव सामन्यात चमकदार कामगिरी करतील अशा युवा खेळाडूंची निवड करायला हवी. बाकी वर्कलोड हा मूर्खपणा असल्याचं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे.

पहिल्या कसोटीचा धावता आढावा

कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजीला आल्यावर 245-10 धावा केल्या होत्या. यामध्ये के. एल राहुल याने 101 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर आफ्रिका संघाने पहिल्या डावात 408-10 धावा केल्या, यामध्ये डीन एल्गर याने 185 धावांची शानदार खेळी केली होती. त्यासोबतच मार्को जान्सेन यानेही 84 धावांची नाबाद खेळी केली होती.

टीम इंडियाला दुसऱ्या डावात बॅटींगला उतरल्यावर आफ्रिका संघाने 163 धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात टीम इंडिया 131-10 वर ऑल आऊट झाली होती. विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. शुबमन गिल याने 26 धावा केल्या होत्या. टीम इंडियाच्या इतर एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

दरम्याान, टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीला  केप टाऊन येथे होणार आहे. या सामन्यामध्ये टीम मॅनेजमेंट संघात कोणते बदल करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोहम्मद शमी याच्या जागी बदली खेळाडू आवेश खान याची संघात निवड करण्यात आलीये.