भारत आणि ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना आता रंजक वळणावर आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल जोडीची भागीदारी काही अंशी तारक ठरली. पण त्यानंतर शेवटी एका पाठोपाठ एक विकेट पडल्याने टीम इंडिया अडचणीत आली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 5 विकेट गेल्या होत्या. तसेच ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा ही जोडी होती. त्यामुळे या जोडीकडून फार अपेक्षा होत्या. पण या जोडीने काही खास केलं नाही. ऋषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून सुनील गावस्कर यांचा संताप झाला. लाईव्ह समालोचनावेळी सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतच्या हलगर्जीपणाचे वाभाडे काढले. ऋषभ पंत मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 37 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. यावेळी त्याने 3 चौकार मारले होते. पण मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट देऊन बसला. नाथन लायनच्या हाती झेल देऊन बाद झाला.
ऋषभ पंतने निवडलेला शॉट पाहून समालोचन करणाऱ्या सुनील गावस्कर यांना राग अनावर झाला. ऋषभ पंतने वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडच्या चेंडूवर फाईन लेगच्या वरून पिक अप रँप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा शॉट ऋषभ पंत कायम खेळतो. पण यावेळी हा शॉट खेळताना चूक झाली. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. एकदा फटका चुकल्यानंतर पुन्हा दुसऱ्या चेंडूवर ऑफ स्टम्प जवळ येऊन रँप शॉट खेळला. पण यावेळी चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागत डीप थर्म मॅनकडे गेला आणि बाद झाला. ऋषभ पंतची ही चूक पाहून सुनील गावस्कर यांनी त्याचे वाभाडे काढले.
“Stupid, stupid, stupid!” 😡
🏏 Safe to say Sunny wasn’t happy with Rishabh Pant after that shot.
Read more: https://t.co/bEUlbXRNpm
💻📝 Live blog: https://t.co/YOMQ9DL7gm
🟢 Listen live: https://t.co/VP2GGbfgge #AUSvIND pic.twitter.com/Fe2hdpAtVl— ABC SPORT (@abcsport) December 28, 2024
समालोचन करताना सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, ‘मूर्ख.. मूर्ख..मूर्ख.. तुमच्याकडे दोन फिल्डर आहे आणि तुम्ही आताही असाच शॉट खेळायला जाता. मागचा शॉट चुकला होता आणि बघा तुमचा झेल कुठे पकडला गेला. ही विकेट दिली. तुम्ही असं बोलू शकत नाही की हा तुमचा नैसर्गिक खेळ आहे. मला माफ करा. हा नैसर्गिक खेळ नाही. हा एक मूर्खपणा आहे. तुमच्या संघाला आणखी कमकुवत करत आहे. तुम्हाला स्थिती समजणं गरजेचं आहे.’