मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलच्या या हंगामासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच होम ग्राउंडमध्ये सर्व संघ खेळणार आहेत. तसेच यंदा कोणतेही कोरोना निर्बंध नसणार आहेत. त्यामुळे कोणत्याही बंधनाशिवाय आयपीएल खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी एका गोलंदाजांना कारनामा केला आहे. या गोलंदाजांना टाकलेल्या सर्वच्या सर्व ओव्हर या मेडन टाकल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे गोलंदाजाने 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे फलंदाजांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
वेस्टइंडिजमध्ये खेळवण्यात येत असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सुनील नारायण याने हा कारनामा केला आहे. क्विन्स पार्क क्रिकेट क्लबकडून खेळताना सुनीलने क्लार्क रोड यूनायटेड विरुद्धच्या सामन्यात हा कहर केला. सुनीलच्या या कारनाम्यामुळे क्लार्क रोड यूनायटेड अवघ्या 76 धावांवर ऑलआऊट झाला.
सुनीलने एकूण 7 ओव्हर बॉलिंग केली. या 7 ओव्हर टाकताना सुनीलने एकही रन दिली नाही. सुनीलने चिवटपणे बॉलिंग टाकली. सुनीलशिवाय शॉन हॅकलेट याने 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. क्लार्क रोडकडून फलंदाजाने सर्वाधिक 21 धावा केल्या. या सामन्यात क्वीन्स पार्क टीमने 3 विकेट्स गमावून 268 धावा करुन 192 रन्सची आघाडी घेतली.
स्कोअरकार्ड
क्लार्क रोड यूनायटेड – 76-10, सुनील नारायण 7 विकेट्स 0 धावा.
क्वीन्स पार्क क्रिकेट क्लब – 268/3, इसाह राजा -100
सुनीलला आयपीएलमध्ये मिस्ट्री बॉलर म्हटलं जातं. सुनीलने आतापर्यंत 148 सामन्यांमध्ये 152 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सुनीलने आयपीएलमध्ये 7 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष बाब म्हणजे 2013 मध्ये सुनीलने हॅट्रिकही घेतली होती.
तसेच आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सुनीलने विंडिजकडून 6 कसोटी सामन्यांमध्ये 21, 65 वनडेत 92 आणि 51 टी 20 क्रिकेटमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. यंदा सुनील आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.
आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, रहमानुल्लाह गुरबाज, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, सुनील नारायण, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर , शाकिब अल हसन, मनदीप सिंह, लिटॉन दास, कुलवंत खेजरोलिया, डेविड विसे, सुयश शर्मा, वैभव अरोडा आणि एन. जगदीशन.