IPL 2024 | काव्या मारन हिने या खेळाडूला फक्त वापरून घेतलं, नेटकरी भयंकर संतापले

| Updated on: Mar 04, 2024 | 4:46 PM

आयपीएल 2024 आधी मोठे उलटफेर पाहायाला मिळायला मिळालेत. मुंबईचा कॅप्टन बदलला आता हैदराबादनेही नवीन कॅप्टनची निवड केली आहे. त्यानंतर काव्या मारन हिच्यावर टीका होत असलेली पाहायला मिळत आहे.

IPL 2024 | काव्या मारन हिने या खेळाडूला फक्त वापरून घेतलं, नेटकरी भयंकर संतापले
Follow us on

मुंबई : आयपीएल2024 आधी आणखी एका संघाचा कर्णधार बदलला आहे. ट्रेंडिंग विन्डोमध्ये मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या याला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. आता सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपद पॅट कमिन्स याची निवड करण्यात आली आहे. आयपीएल आधी झालेल्या लिलावामध्ये सनरायजर्स संघाने पॅट कमिन्स याला इतिहासातील दुसरी सर्वात विक्रमी बोली लावली होती. कमिन्सला संघात घेतलं होतं तेव्हाचं त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची चर्चा सुरू होती. आता हैदराबाद संघाने याची अधिकृत घोषणा केली आहे.

सनरायजर्स हैदराबाद संघाचा नवीन कर्णधार

सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्स याची निवड करण्यात आली आहे. आयपीएलआधी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावावमध्ये कमिन्सला 20 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं होतं. आयपीएल इतिहासामधील ही दुसरी सर्वात मोठी बोली ठरली होती. काव्य मारन त्यावेळी हैदराबाद संघानकडून ऑक्शन टेबलवर होती.

पॅट कमिन्स याला कर्णधार केल्याने नेटकरी मात्र खरतनाक तापले आहेत. कारण दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू एडन मार्करम याला कर्णधारपदावरून हटवलं आहे. मार्करम याने आताचा झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील 20 लीगमध्ये सनरायझर्स इस्टर्न संघाची धुरा सांभाळली. दोन्ही सीझनमध्ये मार्करम याने संघाचा विजेतेपद जिंकून दिलं होतं. मात्र आयपीएलमधील संघाच्या खराब कामगिरीचं खापर एकट्यावर फोडत त्याला आता बाजूला केलं गेलं आहे.

सनरायजर्स हैदराबाद संघाच्या या निर्णयामुळे नेटकरी नाराज आहे. काहींनी काव्याने मार्करम याचा आयपीएलमध्ये वापर करून घेतला, अशी टीका केली आहे. कारण हैदराबाद संघाला पर्याय नसल्याने त्यांनी मार्करमकडे कर्णधारपद सोपवलं होतं. आता पर्याय उपलब्ध झाला की त्याला कर्णधारपदावरून काढलं गेलं आहे.

सनरायजर्स हैदराबाद आयपीएल फायनल संंघ 2024

पॅट कमिन्स (C) अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नायक. नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.