मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super giants) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. लखनौचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळला असून त्यांनी दोन विजय मिळवले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या लढतीत त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) 211 धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य पार केलं. आज तिसऱ्या सामन्यात त्यांनी 169 धावांचा यशस्वी बचाव केला. लखनौच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावली. त्याचा लखनौ सुपर जायंट्सला फायदा झाला. आज नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामना झाला. आपीएल 2022 मधील हा 12 वा सामना होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 12 धावांनी विजय मिळवला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. लखनौने विजयासाठी 170 धावाचे लक्ष्य दिले होते. SRH ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. SRH च्या सलग दुसऱ्या पराभवामुळे या संघाची मालकीण काव्या मारन पुन्हा एकदा निराश झाली आहे.
सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसनने टॉस जिंकला असून प्रथम क्षेत्ररक्षण करणय्चा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सने मागच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा मोठा पराभव केला होता. ते आज विजय मिळवतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 12 धावांनी विजय मिळवला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. लखनौने विजयासाठी 170 धावाचे लक्ष्य दिले होते. SRH ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या.
The BIG man from west indies @Jaseholder98 takes another one and rounds his tally up to 2.
Its looking good for us.#AbApniBaariHai #bhaukaalmachadenge#IPL2022 ? #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/j2MwPu3l8D— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 4, 2022
19 षटकात SRH च्या सहा बाद 154 धावा झाल्या आहेत. सुंदर 18 आणि शेपहर्ड सात धावांवर खेळतोय.
मोक्याच्या क्षणी निकोलस पूरनची महत्त्वाची विकेट LSG ला मिळाली आहे. आवेश खानच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डाकडे झेल दिला. त्याने 34 धावा केल्या.
17 षटकात SRH च्या बाद 137 धावा झाल्या आहेत. निकोलस पूरन-वॉशिंग्टन सुंदरची जोडी मैदानात आहे. पूरन 28 आणि सुंदर 18 धावांवर खेळत आहे.
सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 30 चेंडूत 50 धावांची आवश्यकता. 15 षटकात SRH च्या चार बाद 120 धावा झाल्या आहेत.
SRH ने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 14 षटकात त्यांच्या चार बाद 105 धावा झाल्या आहेत. चांगली फलंदाजी करणाऱ्या राहुल त्रिपाठीने 44 धावांवर कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर रवी बिश्नोईकडे झेल दिला.
पहिल्या दोन विकेट लवकर गेल्यानंतर एडन मार्कराम आणि राहुल त्रिपाठीने डाव सावरला होता. SRH च्या दहा षटकात दोन बाद 82 धावा झाल्या होत्या. 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कृणाल पंडयाने मार्करामला 12 धावांवर राहुलकरवी झेलबाद केले.
आवेश खानने SRH ला दिला दुसरा झटका. अभिषेक शर्मा 13 धावांवर झेलबाद. संघाची स्थिती दोन बाद 39 धावा.
लखनौला मोठी विकेट मिळाली आहे. आवेश खानने पहिला झटका दिला आहे. SRH चा कॅप्टन केएन विलियमसन 16 धावांवर झेलबाद झाला. 28 धावांवर एक विकेट अशी SRH ची स्थिती आहे.
दोन षटकात SRH च्या बिनबाद 11 धावा झाल्या आहेत. केन विलियमसन आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानात आहे.
प्रथम फलंदाजी करताना LSG ने निर्धारीत 20 षटकात 7 बाद 169 धावा केल्या. लखनौकडून केएल राहुल 68 धावांची कॅप्टन इनिंग्स खेळला. त्यानंतर दीपक हुड्डाने 51 आणि आयुष बदोनीने 19 धावा केल्या. SRH विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Its time to defend with all our Super Giant might.
Over to the bowlers now!#AbApniBaariHai #bhaukaalmachadenge#IPL2022 ? #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/w6jDXvtGDr— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 4, 2022
19 षटकात LSG च्या सहाबाद 151 धावा झाल्या आहेत. कॅप्टन केएल राहुलने 68 धावांची शानदार खेळी केली.
दीपक हुड्डा 51 धावांवर आऊट झाला. राहुल आणि त्याने चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. शेपहर्डच्या गोलंदाजीवर त्याने त्रिपाठीकडे झेल दिला. चार बाद 114 अशी लखनौची स्थिती आहे.
दीपक हुड्डा आणि केएल राहुलची जोडी जमली आहे. दीपक हुड्डाने 31 चेंडूत 50 धावा केल्या. राहुल 49 धावांवर खेळतोय. 15 षटकात लखनौच्या तीन बाद 114 धावा झाल्या आहेत.
12 षटकात LSG च्या तीन बाद 85 धावा झाल्या आहेत. राहुल 41 आणि दीपक हुड्डा 31 धावांवर खेळतोय.
उमरान मलिकने दहावं षटक टाकलं. त्याच्या एका ओव्हरमध्ये राहुल-दीपक हुड्डाने 20 धावा वसूल केल्या. राहुल 36 हुड्डा 20 धावांवर खेळतोय.
नऊ षटकात लखनौ सुपर जायंट्सच्या तीन बाद 48 धावा झाल्या आहेत. कॅप्टन केएल राहुल 26 आणि दीपक हुड्डा 9 धावांवर खेळतोय.
अब्दुल समदच्या चेंडूवर राहुलचा चौकार मारला आहे. लखनौने 7 ओवर 4 बॉलमध्ये 41 धावा झाल्या आहेत. तर लुईस, क्विंटन डिकॉक आणि मनीष पांडे आऊट झाले आहेत.
लखनौने 7 ओवरमध्ये 35 धावा काढल्या आहेत. तर लुईस, क्विंटन डिकॉक आणि मनीष पांडे आऊट झाले आहेत.
148.0 ?
147.5 ?Not just some numbers, just the speeds of the first two balls that Umran has bowled in this match ⚡#SRHvLSG #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 4, 2022
लखनौला तिसरा झटका बसला असून मनीष पांडे आऊट झाला आहे. लखनौचे चार ओवर पाच बॉलमध्ये 27 रन झाले असून तीन विकेट गेल्या आहेत.
AND IT’S THREE!! BIG SHEP GETS IN ON THE ACT! ??#SRHvLSG #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/jfCbJQHAMr
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 4, 2022
वाशिंगटन सुंदरने दुसरी विकेट घेतली असून लखनौला दुसरा झटका बसलाय. लुईस LBW आऊट झालाय. लखनौच्या चार ओवर एक बॉलमध्ये सतरा धावा
WASHINGTON SUNDAR!!!!! ???#SRHvLSG #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 4, 2022
लखनौने तीन ओवरमध्ये 16 धावा काढल्या आहेत. क्विंटन आऊट झालाय.
पहिल्या षटकाच्या चौथ्या बॉलमध्ये केएल राहुलचा पहिला चौकार लगावला आहे. एकुण आठ रन झाले आहेत.
पहिल्या षटकाच्या तीन बॉलमधून तीन धावा लखनौने काढल्या आहेत. केएल राहुल फलंदाजी करतायेत
केएल राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरले. भुवनेश्वर गोलंदाजी करतायेत.
हैदराबादने टॉस जिंकला आहे. सामन्यात लखनऊ पहिले फलंदाजी करणार आहे. तर हैदराबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आगहे
Washing-TON. ?#OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/XjBqYBJYNa
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 4, 2022
केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्रयू टाय, रवी बिश्नोई, आवेस खान
We pray together.
We play together,
We fight together.
#bhaukaalmachadenge आज रात – साढ़े साथ#AbApniBaariHai?#IPL2022 ? #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/tQAEApL81J— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 4, 2022