Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव याचं विंडिज विरुद्ध तुफान, इतक्या बॉलमध्ये ठोकलं अर्धशतक

| Updated on: Aug 08, 2023 | 11:10 PM

Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव याने आपल्या टी 20 कारकीर्दीत पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिलाय.

Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव याचं विंडिज विरुद्ध तुफान, इतक्या बॉलमध्ये ठोकलं अर्धशतक
Follow us on

गयाना | टीम इंडियाच्या चाहत्यांना विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव याचा झंझावात पाहायला मिळालाय. सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यात विंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत अर्धशतक पूर्ण केलंय. सूर्याने विंडिज विरुद्ध 160 धावांचा पाठलाग करताना फक्त 23 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. म्हणजेच सूर्याने 40 धावा या फक्त 9 बॉलमध्ये पूर्ण केल्या. सूर्याच्या टी 20 कारकीर्दीतील हे 14 वं अर्धशतक ठरलं.

सूर्यकुमार यादव याचं खणखणीत अर्धशतक

हे सुद्धा वाचा

विंडिजने टीम इंडियाला 160 धावांचं आव्हान दिलं. विजयी धावांचं पाठलाग करताना टीम इंडियाने लवकरच 2 विकेट्स गमावले. डेब्यूटंट यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच बॉलवर 1 रन करुन आऊट झाला. तर शुबमन गिल याने पुन्हा निराशा केली. शुबमन 6 रन्स करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 34 अशी स्थिती झाली.

सूर्यकुमारने टॉप गिअर टाकत दणादण चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली. सूर्याने येईल त्या बॉलरला बॅटने चोप द्यायला सुरुवात केली. सूर्याने 23 बॉलमध्ये 217.39 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. सूर्या अर्धशतक ठोकल्यानंतर आणखी आक्रमक झाला. सूर्याने धु धु धुवायला सुरुवात केली. सूर्याने उलटसुलट शॉर्ट माराले. आता सूर्या शतकच करतो, असंच वाट होतं. मात्र इतक्यात सूर्या मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला.

सूर्यकुमार यादव याची फटकेबाजी

सूर्याला अल्जारी जोसेफ याने ब्रँडन किंग याच्या हाती कॅच आऊट केला. मात्र तोवर उशीर झाला होता. सूर्या आऊट झाला, मात्र त्याने टीम इंडियाला विजय सोपा करुन दिला. सूर्याने 44 बॉलमध्ये 10 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 83 धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.