6,6,6,6, सूर्यकुमार यादव याचा कांगारुंना दणका, एकाच ओव्हरमध्ये ठोकले 4 सिक्स, व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Sep 24, 2023 | 7:23 PM

Suryakumar Yadav 4 Six Video | टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढलाय. सूर्याने सलग 4 बॉलमध्ये 4 सिक्स ठोकले. सूर्याच्या या खेळीचा व्हीडिओ व्हायरल झालाय.

6,6,6,6, सूर्यकुमार यादव याचा कांगारुंना दणका, एकाच ओव्हरमध्ये ठोकले 4 सिक्स, व्हीडिओ व्हायरल
Follow us on

इंदूर | टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. सूर्याला वनडे क्रिकेट जमत नाही, असं म्हणणाऱ्यांना सूर्याने या अर्धशतकासह चपराक लगावली. सूर्याने हाच फॉर्म ऑस्ट्रेलिया विरुद्ध कायम राखत तोडू खेळी केली. आहे. सूर्याने मध्यप्रदेशमधील इंदूर येथील होळकर स्टेडियममध्ये धमाका केलाय. सूर्यकुमार यादव याने एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स ठोकलेत. सूर्याने कॅमरुन ग्रीन याच्या बॉलिंगवर हा कारनामा केला. सूर्याच्या या 4 सिक्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच बीसीसीआयनेही सूर्याच्या या 4 सिक्सचा व्हीडिओ ट्विट केलाय.

सूर्याने टीम इंडियाच्या डावातील 44 व्या ओव्हरमध्ये कॅमरुन ग्रीन याच्या बॉलिंगवर सलग 4 सिक्स ठोकले. सूर्याने सलग 4 सिक्स खेचल्याने आता तो 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकतो की काय असं वाट होतं. मात्र पाचव्या बॉलवर सूर्याने सिंगल रन घेतली. त्यामुळे सूर्याची 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकण्याची संधी हुकली. सूर्याने यानंतरही फटकेबाजी सुरुच ठेवली.

सूर्याने 24 बॉलमध्ये 5 खणखणीत सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकलं. सूर्या अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झाला. सूर्या टॉप गिअर टाकत सुस्साट सुटला. सूर्याने अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढला. सूर्याने अवघ्या 37 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची खेळी केली. सूर्याने अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 400 धावांचे आव्हान देता आले.

सूर्याची चाबूक बॅटिंग


ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.