मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून दहा संघ जेतेपदासाठी सज्ज झाले आहेत. 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. यात मुंबई इंडियन्स चार सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मैदानात उतरणार आहे. तसेच रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. तर सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर असून आयपीएलमध्ये पुनरागमन करेल. तत्पूर्वी सूर्यकुमार यादवची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. एका खास गिफ्टबाबत त्याने उल्लेख केला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला खास गिफ्ट काय मिळालं याची जोरदार चर्चा रंगली आहे. सूर्यकुमार यादव याने सरीन स्पोर्ट्स आणि जतीन सरीन यांना या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. या पोस्टमध्ये एक मोठा बॉक्स दिसत आहे. या बॉक्सचा फोटो काढून सूर्यकुमार यादवने नवीन वर्षाचं बेस्ट गिफ्ट अशी पोस्ट केली आहे.तसेच धडकणाऱ्या हृदयाची इमोजी टाकली आहे. आता या बॉक्समध्ये नेमकं काय आहे याची चर्चा रंगली आहे.
सूर्यकुमार यादवने या बॉक्समध्ये नेमकं काय आहे हे काही उघड केलेलं नाही. पण टॅग केलेल्या पेजवरून स्पोर्ट्स किट असावं याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवचे चाहते पुढच्या पोस्टकडे आस लावून बसले आहेत. नेमकं त्या बॉक्समध्ये काय आहे याची उत्सुकता ताणली गेली आहे. या बॉक्समध्ये स्पोर्ट्स किट असावं हाच बहुतांश क्रीडाप्रेमींचा अंदाज आहे.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्ससोबत आहेत. त्यानंतर 27 मार्चला सनराईजर्स हैदराबादशी लढत असेल. 1 एप्रिलला राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. तर 7 एप्रिल दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. आयपीएलचं मागचं वेळापत्रक पाहता प्रत्येक संघ 14 सामने खेळतो. त्यामुळे उर्वरित 10 सामन्यांचं शेड्युल लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर झाल्यानंतर समोर येतील.
रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी , शिवालिक शर्मा.