जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्याचं आयोजन हे जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिके विरुद्ध वादळी शतक ठोकलं आहे. सूर्यकुमारने हे शतक अवघ्या 55 बॉलमध्ये पूर्ण केलं. सूर्यकुमारचं हे टी 20 कारकीर्दीतील चौथं शतक ठरलं.
सूर्याने या शतकासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सूर्या टीम इंडियाकडून जोहान्सबर्गमध्ये शतक करणारा पहिलाच भारतीय ठरला. तसेच सूर्या टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा दुसरा भारतीय आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला. तसेच सूर्यकुमारने याबाबतीत रोहितच्या विक्रमाचीही बरोबरी केली. रोहित शर्मा, ग्लेन मॅक्सवेल आणि आता सूर्यकुमार यादव टी 20 मध्ये सर्वाधिक शतकं करणारा तिसरा फलंदाज ठरला.
तसेच सूर्यकुमार टी 20 मध्ये 4 देशात प्रत्येकी 1 शतक करणाराही पहिला भारतीय ठरला. सूर्याला शतकानंतर आणखी धावा करण्याची संधी होती. मात्र सूर्या शतकानंतर दुसऱ्या बॉलवर आऊट झाला. सूर्याने 56 बॉलमध्ये 178.57 च्या स्ट्राईक रेटने 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या.
दरम्यान सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या या शतकी भागीदारीमुळेच टीम इंडियाला 200 पेक्षा अधिक धावा करता आल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 60 धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 201 धावा केल्या.
सूर्या 100
𝐂𝐄𝐍𝐓𝐔𝐑𝐘
There is no stopping @surya_14kumar!
Mr. 360 brings up his 4th T20I century in just 55 balls with 7×4 and 8×6. The captain is leading from the front!🙌🏽👌🏽https://t.co/s4JlSnBAoY #SAvIND pic.twitter.com/t3BHlTiao4
— BCCI (@BCCI) December 14, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.