सूर्यकुमार यादवने टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पकडलेला झेल टर्निंग पॉइंट ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यकुमार यादवसोबत त्याच्या अप्रतिम झेलबाबत चर्चा केली. तत्पूर्वी त्याच्या झेलची एक क्लिप दाखवण्यात आली. हा झेल पाहताना सूर्यकुमार यादवच त्या स्वप्नात रमला होता. सूर्याला अशा स्थितीत पाहून पंतप्रधानांनी त्याला आवाज देऊन जागं केलं. तेव्हा सूर्याने आपल्या शैलीत उत्तर देताना सांगितलं की, रमलो होतो. सूर्याने यानंतर झेल घेताना डोक्यात काय सुरु होतं? याबाबत सांगितलं. ‘सर, त्या क्षणी फक्त डोक्यात हेच होतं की, कसं पण करून बॉल आत ढकलायचा. पहिल्यांदा कॅच पकडायचा की नाही हा विचार केला नव्हता. बॉल आत ढकलला तर जास्तीत एक किंवा दोन धावा मिळतील. तेव्हा हवेचा वेगही त्याच दिशेने होता. पण एकदा चेंडू हातात आल्यानंतर दुसऱ्याच्या हातात चेंडू द्यावा असा विचार आला. पण तेव्हा रोहित शर्मा खूपच लांब होता. मग चेंडू जवळच उडवला आणि आत जाऊन झेल पकडला.’, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.
झेल घेण्यामागचं रहस्यही सूर्यकुमार यादवने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर उघड केलं. “अशाप्रकारच्या झेलसाठी आम्ही खूप सराव केला होता. मी एका गोष्टीचा विचार केला होती की मी बॅटिंग तर करतो, पण ही भूमिका संपल्यानंतर कोणत्या गोष्टीत माझं सहकार्य देऊ शकतो. तेव्हा फिल्डिंगबाबत विचार केला.” असं सूर्यकुमार यादवने सांगताच मोदींनी हा सरावही केला जातो का? असं विचारलं. तेव्हा राहुल द्रविडने सांगितलं की, सूर्यकुमार यादवने असे 150 हून अधिक झेल सरावात घेतले आहेत.
Our World T20 🏏 Champions enthralled everyone with their outstanding performances. Had a wonderful conversation with them. Do watch! https://t.co/1UPGbCmx6F
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024
“आयपीएलनंतर अशा कॅचचा बराच सराव केला होता. पण कधी विचार केला नव्हता की देव अशी संधी देईल. अशा झेलचा सराव केला होता त्यामुळे त्या स्थितीत शांत होतो. माहिती होतं की असे कॅच आधी पकडले आहेत. तेव्हा स्टँडमध्ये कोण बसलं नव्हतं? पण यावेळी होते. पण खूप मस्त वाटते त्या क्षणाबद्दल आठवून.”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.