लखनौ : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी भारतीय संघाला झटका (Indian Cricket Team) बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka Cricket Team) टी 20 मालिकेत खेळू शकणार नाही, अशी बातमी मंगळवारी संध्याकाळी मिळाली होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळताना दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे षटक सुरु असतानाच दीपकला मैदान सोडावं लागलं होतं. दीपक चाहर आगामी सीरीजमध्ये खेळू शकणार नाही. त्यातच आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. विस्फोटक फलंदाज आणि नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिका विजयाचा हिरो सूर्यकुमार यादवदेखील (Suryakumar Yadav) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत सहभागी होणार नाही.
सूर्यकुमार सध्या संघासह लखनौमध्ये आहे. मंगळवारी संघाच्या सराव सत्राचाही तो भाग होता. मात्र, क्रिकबझच्या वृत्तानुसार या स्फोटक फलंदाजाला टी-20 मालिकेसाठी अनफिट घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्याला ही दुखापत कधी आणि कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांमध्ये खेळला आणि त्यात त्याने 107 धावा केल्या. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. अशा स्थितीत त्याची संघात अनुपस्थिती भारतासाठी कठीण होऊ शकते. दरम्यान, सूर्यकुमार आगामी टी-20 मालिकेत उपलब्ध नसेल, यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या चिंतादेखील वाढल्या आहेत.
रोहित शर्मा म्हणाला की, ‘सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि मी त्याच्यासाठी खूप दुःखी आहे.’ भारत-श्रीलंका टी-20 मालिकेपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत रोहित शर्माने आपली व्यथा मांडली. रोहित म्हणाला, सूर्यकुमार यादवची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. इतर खेळाडू आहेत जे त्यांना संधी मिळण्याची वाट पाहात आहेत पण मी सूर्यकुमारसाठी दुःखी आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. परंतु सत्य हे आहे की आपण दुखापत टाळू शकत नाही. तो लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे. चांगली गोष्ट अशी आहे की काही खेळाडू आहेत, जे संधीची वाट पाहात आहेत, आता त्यांना संधी मिळेल आणि ते स्वतःला सिद्ध करु शकतील.
एका प्रश्नाच्या उत्तरात रोहित शर्माने असेही सांगितले की, मला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे पण कोणत्याही वरिष्ठ खेळाडूला दुखापत होऊ नये असे मला वाटते. रोहित म्हणाला, ‘सीनियर खेळाडूला दुखापत होऊन तरुण खेळाडूला संधी मिळावी, अशी माझी इच्छा नाही. मी स्वत: अनेकदा दुखापतग्रस्त झालो आहे आणि मला माहित आहे की कमबॅक करणं कठीण असतं. तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. कोणालाही दुखापत होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तसेच आणखी एक गोष्ट खरी आहे की, आम्ही प्रत्येक सामन्यात प्रत्येकाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकत नाही. परंतु ही रोटेशन पद्धत सुरु ठेवली जाईल, ज्यामुळे सर्व खेळाडू फ्रेश राहतील.
इतर बातम्या
IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?
ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट
IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत